Join us

उमेशसोबत रोमॅण्टिक झाली प्रिया; 'तो' फोटो शेअर केल्यामुळे होतीये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 12:14 IST

Priya bapat: प्रिया कायम उमेशसोबतचे फोटो शेअर करत असते. मात्र, यावेळी तिने शेअर केलेला फोटो चर्चेचा विषय ठरला आहे.

मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन कपल म्हणजे प्रिया बापट (priya bapat) आणि उमेश कामत (umesh kamat). उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर या जोडीने मराठी इंडस्ट्रीत त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळेच पडद्यावर त्यांच्या केमिस्ट्रीला जितकी नेटकऱ्यांची पसंती मिळते. तितकीच ऑफस्क्रीनदेखील ही जोडी लोकप्रिय आहे. यामध्येच प्रियाने उमेशसोबत एक रोमॅण्टिक फोटो शेअर केला आहे. जो पाहून नेटकऱ्यांमध्ये या जोडीची चर्चा रंगली आहे.

प्रिया आणि उमेश कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही बरेच सक्रीय आहेत. त्यामुळे ही जोडी कायम एकमेकांविषयीचं प्रेम जाहीरपणे सोशल मीडियावर व्यक्त करत असतात. यामध्येच प्रियाने उमेशसोबत एक रोमॅण्टिक फोटो शेअर केला आहे. हा फोटो ब्लॅक अँड व्हाइटमध्ये आहे.

प्रिया आणि उमेश या जोडीचं लव्ह मॅरेज आहे. प्रिया उमेशपेक्षा जवळपास ८ वर्षाने लहान आहे. मात्र, त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना कायम आवडते. या जोडीने आतापर्यंत बऱ्याचदा एकत्र काम केलं आहे. यात अलिकडेच त्यांचं नवा गडी नवं राज्य हे नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या नाटकात ही जोडीने एकत्र रंगमंचावर झळकली होती.

टॅग्स :प्रिया बापटउमेश कामतसेलिब्रिटीटिव्ही कलाकार