नाटक, सिनेमा आणि मालिका अशा विविध माध्यमांमधून प्रिया मराठे हे नाव घराघरात पोहोचले आहे. प्रियाने आपल्या अभिनयाच्या कौशल्याने रसिकांच्या मनात एक वेगळ स्थान निर्माण केले आहे. प्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर ती नेहमीट तिचे फोटो शेअर करत असते.
प्रिया सध्या पत्नी शंतून मोघे सोबत हिमाचल प्रदेशमध्ये व्हॅकेशन करते आहे. तिथले फोटो आणि व्हिडीओ ती इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्ससोबत शेअर करते आहे. पॅराग्लायडिंग करतानाचे फोटो तिने शेअर केले आहेत. एका व्हिडीओत ती बर्फात खेळताना दिसते आहे. प्रियाचे फोटो आणि व्हिडीओ त्याच्या फॅन्सना आवडले आहेत.