Priyadarshini Indalkar Onkar Raut : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राची हास्यजत्रामधील वनिता खरात हिचे लग्न पार पडले. या लग्नात हास्यजत्रेतल्या सर्व कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी या कलाकारांनी एकमेकांसोबत भरपूर फोटोसेशन केले. या फोटोंमध्ये सर्वांचे लक्ष एका खास फोटोने वेधले. हा फोटो होता प्रियदर्शनी इंदलकर आणि ओंकार राऊत यांचा. हा फोटो समोर येताच दोघांच्या अफेरच्या चर्चा सुरू झाल्या.
हास्यजत्राफेम वनिता खरात हिने सुमित लोंढेसोबत लगीनगाठ बांधली. तिच्या लग्नाला हास्यजत्रेची संपूर्ण टीम आली होती. त्यावेळी कलाकारांनी फोटो काढले आणि आपापल्या सोशल मीडियावर शेअर केले. प्रियदर्शनीनेसुद्धा ओंकारसोबतचा रोमॅण्टिक फोटो शेअर केला. फोटोत ओंकार प्रियदर्शिनीच्या डोळ्यात पाहत आहे तर ती त्याच्या छातीवर अलगद हात ठेवून उभी आहे. हा फोटो पाहून ते दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याची चर्चा सुरू झाली. त्यांच्या फोटोवर अनेकांनी शुभेच्छाही दिल्या.
मराठी अभिनेता आस्ताद काळेने त्यांच्या फोटोवर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा अशी कमेंट केली. त्याच्या कमेंटनंतर चाहत्यांचाही त्या दोघांच्या नात्यावर विशअवास बसला. त्यामुळे अनेक चाहत्यांनीही कमेंट सेक्शनमध्ये प्रियदर्शनी आणि ओंकारचे अभिनंदन केले. यासर्व गोष्टींवर प्रियदर्शनीने आता खुलासा केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत प्रियदर्शिनीने म्हणाली की, 'आस्ताद काळेने कमेंट केली आणि मी त्यावर रिप्लाय दिला. मला माहीत नव्हतं की, एका साध्या गोष्टीची पुढे इतकी चर्चा होईल. पण आमच्यात तसं काहीच नाही. आम्ही दोघे खूप चांगले मित्र आहोत. लोकांना आमच्यात प्रेम दिसते हेच लोकांचे आमच्यावरचे प्रेम आहे.'