Join us

प्रियंका चोपडाच्या ‘काय रे रास्कला’चे पोस्टर रिलीज!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2017 3:07 PM

‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटाच्या यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा पुन्हा एकदा मराठी चित्रपट प्रोड्यूस करणार आहे. तिच्या या नव्या ...

‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटाच्या यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा पुन्हा एकदा मराठी चित्रपट प्रोड्यूस करणार आहे. तिच्या या नव्या चित्रपटाचे नाव ‘काय रे रास्कला’ असे असून, त्याची झलकही नुकतीच बघावयास मिळाली आहे. प्रियंकाने तिच्या ट्विटर अकाउंटवरून चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले असून, त्यामध्ये फक्त दोनच नावाचा उल्लेख केलेला आहे. पहिले नाव राजा असून, दुसरे नाव गुड्डू आहे. मात्र राजा आणि गुड्डूचा चेहरा मात्र या पोस्टरमध्ये दाखविलेला नाही. कारण त्यांचे केवळ शरिर दिसत असून, डोक्याच्या ठिकाणी नारळं दिसत आहेत. आता असे का केले असावे, याचे उत्तर चित्रपटाच्या रिलीजनंतर प्रेक्षकांना मिळेलच.असो, या पोस्टरचे आणखी एक वैशिष्ट्ये सांगायचे झाल्यास यावर चित्रपटाच्या रिलीज डेटचाही खुलासा करण्यात आला आहे. ‘काय रे रास्कला’ हा एक कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपटाला गिरीधरन स्वामी दिग्दर्शित करणार असून, हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. राजा आणि गुड्डू या चित्रपटात लीड रोलमध्ये बघावयास मिळणार आहेत. तर प्रियंकाच्या पर्पल पेबल या प्रॉडक्शन हाउसअंतर्गत चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. प्रियंकाच्या व्हेंटिलेटर या मराठी चित्रपटाला चांगले यश मिळाले होते. तसेच बरेचसे नामांकित पुरस्कारांचीही चित्रपटाने लयलुट केली होती. आता तिचा हा दुसरा प्रोजेक्ट आहे. दरम्यान प्रियंका केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटांचीही निर्मिती करीत आहे. ती सध्या संजय लीला भंसाळी यांच्यासोबत सर्वश्रेष्ठ ज्ञानपीठ हा साहित्य पुरस्कार प्राप्त अमृता प्रीतम यांच्या जीवनावर आधारित चित्रफटाची निर्मिती करीत आहेत. तब्बल दोन वर्षाच्या ब्रेकनंतर प्रियंका या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे.  या चित्रपटात प्रियंका अमृता प्रीतम यांची भूमिका साकारणार आहे. अमृता प्रीतम पंजाबी साहित्याच्या कवियत्री, कांदबरीकार आणि कथा लेखिका आहेत. भारतातच नव्हे तर पाकिस्तानतही त्यांच्या लिखाणाचे कौतुक केले गेले. आता आलेल्या माहितीनुसार अमृता यांचे प्रेमी गीतकार साहिर लुधियानवी यांची भूमिका शाहरूख खान साकारणार आहे.