Join us  

प्रिया का धावतेय ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2016 6:05 PM

            प्रिया बापट नेहमीच आपल्याला विविध भूमिकांमध्ये तिच्या प्रत्येक चित्रपटात पाहायला मिळते. चित्रपटा ...

 
 
 
         प्रिया बापट नेहमीच आपल्याला विविध भूमिकांमध्ये तिच्या प्रत्येक चित्रपटात पाहायला मिळते. चित्रपटा व्यतिरिक्त प्रियाला अनेक गोष्टींची आवड आहे.  तिला व्यायाम आणि सायकलींग करायला फार आवडते. नुकतीच प्रिया अभिनेता मिलिंद सोमण याच्या सोबत १० किलोमीटरच्या मॅरॅथॉनमध्ये धावली आहे. सोशल मीडियावर प्रिया आणि  मिलिंदचे फोटो व्हायरल झाले आहेत. प्रिया तिच्या फिटनेसच्या बाबतीत नेहमीच जागरुक असते. जिममध्ये जाऊन आल्याशिवाय तिचा दिवस सुरु होत नाही. त्यामुळे  दररोज सकाळी प्रिया न चुकता जिममध्ये जाऊन वर्कआऊट करते. मिलिंदसोबत धावण्यासाठी प्रियाने नक्कीच जबरदस्त तयारी केली असणार हे काही वेळ सांगायला नको. प्रिया वजनदार या चित्रपटात जरी गोलु मोलु दिसत असली तरी आता ती एकदमच फिट झाली आहे. कलाकारांना भूमिकेसाठी अतिशय मेहनत घ्यावी लागते. एखाद्या पात्रासाठी वजन वाढवावे लागते. तर कधी अगदी साईज झिरो देखील करावी लागते. आता प्रियाचेच पाहा ना तिने वजनदार या चित्रपटासाठी एकदम वजन वाढवले. मात्र आता  मॅरेथॉनमध्ये धावताना ती एकदम तंदुरुस्त दिसत होती. त्यामुळे नेहमीच कलाकारांना रिल लाईफ आणि रिअल लाईफ मध्ये समतोल साधताना कसरत करावी लागते. प्रिया आता जरी फिट दिसत असली तरी तिला यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली आहे. घाम गाळावा लागला आहे. आणि म्हणूनच ती मिलिंद सोबत मॅरॅथॉन मध्ये १० किलोमीटरचे अंतर पळून पार करु शकली आहे.