Join us

Pulwama Attack : पुलवामा शहिदांवर अमित्रियान पाटीलची 'रेड इंक' ही भावनिक कविता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 14:00 IST

मराठी अभिनेता अमित्रियान पाटील याने देखील पुलवामा येथे शाहिद झालेल्या जवानांप्रती एका वेगळ्या अंदाजात आदरांजली वाहिली आहे.

जगात गुलाबी दिवस साजरा होत असताना, जम्मू-काश्मीर येथील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात भारताच्या ४० जवानांचे रक्त सांडले. या हल्ल्याचा सर्वत्र निषेध होत असून, याची दाखल जागतिक पातळीवर घेतली जात आहे. एक भारतीय म्हणून देशातील प्रत्येक नागरिकांचे आज रक्त पुन्हा एकदा सळसळू लागले आहे. देशभक्तीपर आणि शाहिद जवानांप्रती जयघोष व श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे. मराठी अभिनेता अमित्रियान पाटील याने देखील पुलवामा येथे शाहिद झालेल्या जवानांप्रती एका वेगळ्या अंदाजात आदरांजली वाहिली आहे. त्यासाठी त्याने आपल्या कवीमनाचा आधार घेत, 'रेड इंक' नावाची एक भाऊक कविता यांना बहाल केली आहे. हि कविता इंग्रजीमध्ये असून, या कवितेत तो शाहिद जवानांचा उल्लेख माझी भावंडं अशी करतो. सोशल नेटवर्कींग साईटवर पोस्ट केलेली हि कविता नेटकऱ्यांच्या मनाचा वेध घेण्यास यशस्वी ठरत आहे. तसेच एक अभिनेता म्हणून नव्हे तर, अमित्रियानच्या अंतर्मनात दडलेल्या एका संवेदनशील कवीचा देखील परिचय आपणास होतो. 

शेतकऱ्यांचा आक्रोश मांडणारा, आणि आजच्या तरुण शेतकरीवर्गाला प्रेरणा देणाऱ्या 'आसूड' सिनेमाला ग्रामीण महाराष्ट्रात उदंड प्रतिसाद मिळत आहे. एग्रीकल्चर शाखेत पदवी मिळवलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे भावविश्व मांडणाऱ्या या सिनेमाला नागपूर, कोल्हापूर, जळगाव यांसारख्या भागातील प्रेक्षकांनी चांगली साथ दिली आहे. खास करून, अभिनेता अमित्रियान पाटीलने साकारलेला 'शिवाजी पाटील' प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. शिवाय, राजकारणी डावपेच आणि हेवेदाव्यांचे चोख विश्लेषण या सिनेमात मांडले असल्याकारणामुळे हा सिनेमा सामान्यांच्या मनात थेट घर करण्यास यशस्वी होत आहे.

टॅग्स :अमित्रियान पाटीलआसूडपुलवामा दहशतवादी हल्ला