Join us

'या देशात गुन्हा दडवायला सिस्टीम एकत्र पण..'; पुणे पोर्शे अपघातानंतर मराठी कलाकाराची संतप्त पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 12:20 PM

पुण्यात झालेल्या पोर्शे कार दुर्घटनेनंतर मराठी कलाकार क्षितीज पटवर्धनने लिहिलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झालीय (kshitij patwardhan)

सध्या महाराष्ट्रात दोन घटनांनी देश हादरला आहे असं म्हणता येईल. यो दोन्ही घटनांमध्ये सर्वसामान्य नागरीकांचा निष्पाप बळी गेलाय. पहिली घटना मुंबईतील घाटकोपर परिसरात घडली. मुसळधार वादळी वारा अन् पावसामुळे होर्डींग कोसळलं आणि लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला. तर दुसरीकडे पुण्यात नुकत्याच झालेल्या अपघातातपोर्शे कारने दोन जणांना चिरडलं. ज्या अल्पवयीन मुलाच्या हातून ही घटना घडली त्याला जामिनावर सोडण्यात आलं. याच प्रकरणावर मराठमोळा दिग्दर्शक - लेखक क्षितीज पटपर्धनने संतप्त पोस्ट लिहिली आहे. 

क्षितीजने त्याच्या इन्स्टाग्रावर पोस्ट करुन लिहिलंय की, "मुंबईत होर्डींग असो किंवा पुण्यात गाडी, या देशात गुन्हा दडवायला जेवढ्या तत्परतेने सिस्टीम एकत्र येते, तेवढीसोडवायला येत नाही हे खरं दुर्दैव आहे. आपण नाव, जागा बदलत श्रद्धांजलीच्या पोस्ट लिहायच्या फक्त!" अशी सूचक पोस्ट क्षितीजने लिहिली आहे. क्षितीजच्या या पोस्टवर अनेकांनी त्याचं समर्थन केलंय. 

पुण्यात घडलेली दुर्घटना

पुण्यात रविवारी पहाटे पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना समोर आली. यात दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वेदांत अग्रवाल आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली. आता या अपघात प्रकरणी मोठी माहिती उघड झाली आहे. अपघातातील पोर्शे कार विनानोंदणीच रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

टॅग्स :ड्रंक अँड ड्राइव्हपुणेपोर्शेअपघात