बाल शिक्षणावर आधारित सिनेमात दिसणार पुष्कर लोणकर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 06:30 AM2019-04-10T06:30:00+5:302019-04-10T06:30:00+5:30
'सलमान सोसायटी' या चित्रपटातील दुसऱ्या सत्राचे चित्रीकरण नुकतेच आटपाडी येथे करण्यात आले होते. मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर पुन्हा एकदा सगळी बच्चेकंपनी चित्रीकरणाला लागली आहे.
'सलमान सोसायटी' या चित्रपटातील दुसऱ्या सत्राचे चित्रीकरण नुकतेच आटपाडी येथे करण्यात आले होते. त्यानंतर निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकाने चित्रटातील बालकलकारांच्या परीक्षा असल्याने चित्रीकरण काही काळापुरते पुढे ढकलले होते. मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर पुन्हा एकदा सगळी बच्चेकंपनी चित्रीकरणाला लागली आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक कैलाश काशीनाथ पवार म्हणतात, "चित्रपट बाल शिक्षण यावर भाष्य करणारा आहे. जितकी आम्हाला चित्रपटाची काळजी आहे तितकीच चित्रपटात काम करणाऱ्या प्रत्येक बाल कलकरांच्या शिक्षणाची देखील आहे. त्यामुळेच आम्ही काही काळा चित्रिकरण पुढे ढकलेले होते. आता पुन्हा एकदा शेवटच्या टप्प्यातील चित्रीकरण उत्साहात सुरु झाले आहे.
'सलमान सोसायटी' चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश काशीनाथ पवार करत आहेत. प्राजक्ता एण्टरप्राईजेसच्या बॅनर अंतर्गत चित्रपटाची निर्मिति होत आहे . 'सलमान सोसायटी' हा चित्रपट बालशिक्षणावर आधारित असून ."पढ़ेगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया " ह्या टॅगलाईनवर भोवती आहे.
तसेच ह्या चित्रपटात पुष्कर लोणकर , शुभम मोरे आणि विनायक पोतदार या बाल कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. पुष्कर लोणकर ने याआदी एलिझाबेथ एकादशी, बाजी, रांजण, चि .व चि .सौ. का, फिरकी अशा सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. तर शुभम मोरेने रईसमध्ये बालपणीच्या शाहरुख खानची भूमिका साकारली होती.
चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई, नवी मुंबईच्या जवळील भागात होत असून चित्रपट ह्या वर्षी दिवाळी अगोदर प्रदर्शित करण्याचा मानस निर्मात्यांचा आहे.