Join us

​ शशांक करतोय तारेवरची कसरत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2016 1:21 PM

अभिनेता शशांक केतकर त्याच्या वैविधयपूर्ण अभिनशैली आणि  छोट्या पडद्यामुळे आज घराघरांत पोहोचलेला आहे. बरं हा  नुसता घरातच नाही तर ...

अभिनेता शशांक केतकर त्याच्या वैविधयपूर्ण अभिनशैली आणि  छोट्या पडद्यामुळे आज घराघरांत पोहोचलेला आहे. बरं हा  नुसता घरातच नाही तर कित्येकांच्या मनात देखील जागा मिळवण्यासाठी यशस्वी ठरलेला आहे. श्री नावाने सगळीकडे ओळखला जाणारा शशांक केतकर म्हणजेच आताचा इथेच टाका तंबूमधील कपिल हा केवळ कलाकारच नाही तर तो एक लेखक, कवी आणि राष्ट्रीय स्तरावरचा स्वीमरही आहे. इंजिनीअर असलेल्या शशांकने आॅस्ट्रेलियात जाऊन एमईएम (मास्टर आॅफ इंजिनीअरिंग मॅनेजमेंट)देखील केलं आहे. अशा या चतुरस्र अभिनेत्याची वेळेची फारच गोची झालीय. सध्या त्याची इथेच टाका तंबू हि झी युवावरील मालिका लोकप्रिय होतेय. त्यात  गौरी आणि कपिल चा रोमँटिक प्रपोज सीन अत्यंत गाजतोय. पण सध्या शशांक वेळेअभावी फारच त्रस्त झाला असल्याचे कळतेय. म्हणजेच इथेच टाका तंबू या मालिकेची शूटिंग,तसेच  त्याचं सध्या रंगभूमीवर सुरु असलेलं नाटक, आणि  पुढे सुरु होणाºया सिनेमांचं रिडींग या सर्व गोष्टींचे ताळमेळ सध्या बसत नाहीयेत. सगळ काही एकदमच शशांकला मॅनेज करावे लागत आहे. बरं एवढंच नाही तर त्याचे  आईच्या गावात या वेगळ्या धाटणीचं सुरु केलेलं हॉटेल देखील त्याला सांभाळाव लागत असल्याने शशांकची पुरती धांदल उडालेली आहे. या सर्व गोष्टींचे नियोजन करीत आणि स्वत:च्या फिटनेसकडे लक्ष देताना शशांकची सध्या तारेवरची कसरतच सुरु आहे.  त्यामुळे त्याला आता खरंच असं वाटत असेल कि कुठे कुठे टाकू तंबू ?