Join us

RaanBaazaar : पब्लिक आज और.....; प्राजक्ता माळीच्या नवी पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 10:43 AM

प्राजक्ता या सीरिजमध्ये पहिल्यांदाच बोल्ड अंदाजात प्रेक्षकांसमोर आली त्यामुळे अनेकांना धक्का बसला.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या मराठी सिनेइंडस्ट्रीतील 'रानबाजार' (RaanBaazaar) या वेबसीरिजचे संपूर्ण दहा एपिसोड रिलीज झालेत. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसीरिजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळतेय. प्रत्येक एपिसोडच्या शेवटाला एक असा आश्चर्याचा धक्का मिळतो जेणेकरून कथा वेगळ्याच वळणावर जाऊन पोहोचते.कायम आदर्श सून, मुलगी अशाच भूमिका साकारणारी प्राजक्ता या सीरिजमध्ये पहिल्यांदाच बोल्ड अंदाजात प्रेक्षकांसमोर आली त्यामुळे अनेकांना धक्का बसला.ही सीरिज पाहिल्यावर अनेकांनी प्राजक्ताच्या भूमिकेवर संमिश्र प्रतिक्रिया दिली. 

प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.पब्लिक आज और दो एपिसोड आ रहें हैं । #रानबाजार Time निकालके देखने का…असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.  एकदम जबरदस्त प्राजक्ता,, तुझ्या याच actingचा फॅन आहे मी, कलेतील रत्न "प्राजक्ता", लयच खतरनाक असे अशा कमेंट्स तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी केल्यात.  तिची पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली असून ती व्हायरल होत आहे.

प्राजक्ता माळी रानबाजारमधील भूमिकेबद्दल सांगते, “यापूर्वी मी अशा प्रकारची भूमिका कधीच साकारली नव्हती. या भूमिकेमुळे माझी 'बबली' इमेज बदलली आहे. रत्ना साकारणे मुळीच सोप्पे नव्हते. मुळात प्रत्येक भूमिकेसाठी अभ्यास हा करावाच लागतो. रत्नासाठी मला जरा जास्त मेहनत घ्यावी लागली. सगळ्यात आधी मी माझे वजन वाढवले. रत्ना ही एक वेश्या आहे. त्यामुळे तिची देहबोली, चालणे- बोलणे, तिचे राहणीमान, तिच्यातील आत्मविश्वास या सगळ्याचा मला अभ्यास करावा लागला. यासाठी मी पुण्यातील बुधवार पेठेत आणि मुंबईतील कामाठीपुरात जाऊन तेथील महिलांशी संवाद साधला. त्यांचे निरीक्षण केले. शारीरिक बदलासोबतच मला माझी मानसिकताही बदलावी लागली आणि त्यातूनच ही रत्ना समोर आली. अनेकांनी माझ्या या व्यक्तिरेखेचे कौतुक केले. काहींनी नाराजीही व्यक्त केली. परंतु या नाराजीकडे मी सकारात्मकतेने बघतेय. ही 'रत्ना'ची पोचपावती आहे.''

रानबाजारमध्ये प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडितशिवाय उर्मिला कोठारे, मोहन आगाशे, मोहन जोशी, मकरंद अनासपुरे, सचिन खेडेकर, वैभव मांगले, अनंत जोग, सुरेखा कुडची, अभिजित पानसे, गिरीष दातार, निलेश दिवेकर, श्रेयस राजे, अतुल काळे, वनिता खरात आणि माधुरी पवार यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

टॅग्स :रानबाजार वेबसीरिजप्राजक्ता माळी