शरद केळकरच्या 'रानटी' सिनेमाची सर्वत्र हवा, संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 02:58 PM2024-11-23T14:58:46+5:302024-11-23T14:59:21+5:30

विश्वासघाताच्या पार्श्वभूमीवर रंगणारं सूडनाट्य प्रेक्षकांना शुक्रवारी(२२ नोव्हेंबर) प्रदर्शित  झालेल्या ‘रानटी’ चित्रपटात पहायला मिळणार आहे. 

raanti marathi movie released sharad kelkar sanjay narvekar akshaya gurav santosh juvekar | शरद केळकरच्या 'रानटी' सिनेमाची सर्वत्र हवा, संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

शरद केळकरच्या 'रानटी' सिनेमाची सर्वत्र हवा, संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

आशयघन कथानकासाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठी सिनेसृष्टीमध्ये आता नजर खिळवून  ठेवणारा ‘रानटी’ हा अॅक्शनपट आला आहे. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ चित्रपटात विष्णूची आणि त्याच्या जिगरबाज अंदाजाची कथा पहायला  मिळणार आहे. 'मारायला हत्यार कशाला पाहिजे मीच  हत्यार आहे , मीच  रानटी’ आहे अशी धमकी देत 'विष्णू' ने त्याच्या शत्रूंच्या मनात कशी दहशत निर्माण केली आहे? आपली मैत्री, प्रेम आणि कुटुंब यांच्या संरक्षणासाठी ‘विष्णू' नेमकं काय करतो? कोणत्या नीतीचा अवलंब करून 'विष्णू' त्याच्या शत्रूंना कसं नेस्तनाबूत करणार? हे चित्रपटात पाहणं रंजक आहे. विश्वासघाताच्या पार्श्वभूमीवर रंगणारं सूडनाट्य प्रेक्षकांना शुक्रवारी(२२ नोव्हेंबर) प्रदर्शित  झालेल्या ‘रानटी’ चित्रपटात पहायला मिळणार आहे. 

अभिनेता शरद केळकर यांच्यासोबत संजय नार्वेकर, संतोष जुवेकर,नागेश भोसले, जयवंत वाडकर, संजय खापरे, छाया कदम,अक्षया गुरव, कैलास वाघमारे,माधव  देवचक्के, सुशांत शेलार,हितेश भोजराज, सानवी श्रीवास्तव,नयना मुखे अशी तगडी स्टारकास्ट ‘रानटी’ चित्रपटात आहे. 

अॅक्शन, इमोशन, ड्रामा, लव्ह, जबरदस्त संगीत, उत्कंठावर्धक कथानक आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे केलेलं सादरीकरण यामुळे ‘रानटी’च्या रूपात मनोरंजनाचं एक परिपूर्ण पॅकेजच पहायला मिळणार आहे. ‘रानटी’ अॅक्शनपॅक्ड चित्रपट रसिकांसाठी मनोरंजनाची ‘फूल टू ट्रीट’ असणार आहे. चित्रपटाचा वेग, निर्मितीमूल्य,त्याची मांडणी हे सगळं ‘लार्जर दॅन लाईफ’ दाखविण्यात दिग्दर्शक समित कक्कड  यशस्वी झाले असून निर्माते पुनीत बालन यांची उत्तम साथ त्यांना लाभली आहे. 

‘रानटी’ चित्रपटासाठी हृषिकेश कोळी यांचंलिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम ह्या चित्रपटाला लाभलेली आहे.

Web Title: raanti marathi movie released sharad kelkar sanjay narvekar akshaya gurav santosh juvekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.