Join us

'मी ब्रेक घेतोय, कंटाळा आलाय', राहुल देशपांडेचा मोठा निर्णय, Video शेअर करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 13:11 IST

लोकप्रिय गायक राहुल देशपांडे यानं एक मोठा निर्णय घेतला आहे.

Rahul Deshpande Break:  राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने श्रोत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. घरातूनच गायनाचं बाळकडू मिळालेल्या राहुल देशपांडे यांनी आजवर अनेक गाण्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यामुळे आज राहुल यांचे श्रोते मोठ्या प्रमाणात आहेत. आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे राहुल देशपांडे सध्या चर्चेत आले आहेत. कारण, त्यांनी एक मोठा निर्णय घेतलाय. 

 एक व्हिडीओ राहुल देशपांडे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे.  राहुल देशपांडे आता युट्यूबपासून काही काळ ब्रेक घेणार आहे. याबद्दल त्यांनी स्वतः सोशल मीडियावर याविषयी माहिती दिली. व्हिडीओमध्ये ते म्हणाले, "मी आता ब्रेक घेतोय युट्यूबपासून, खूप केलं. २०२० पासून दर बुधवारी आणि शनिवारी मी येतोच आहे. आता कंटाळा आला आहे. आता मला रिफ्रेश व्हायचं आहे. थोडा विचार करतो आणि परत एकदा येतो. पण, आनंदाची गोष्ट ही आहे की 'आमलाता'शला भरभरून प्रेम मिळत आहे. काहीतरी बरोबर होत आहे. याचं पुर्ण श्रेय तुम्हाला लोकांना आहे. खूप मनापासून तुम्हा सर्वांचे आभार".

राहुल यांनी "Bye till Vasantostav!" असं कॅप्शन देत व्हिडीओ शेअर केलाय. कॅप्शनवरुन चाहत्यांनी अंदाज लावला आहे की, राहुल यांचा ब्रेक हा पुढच्या 'वसंतोत्सव'पर्यंत असेल. ब्रेकनंतर राहुल हे आपल्या चाहत्यांसाठी काय नवं घेऊन येतात, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. राहुल देशपांडेचं युट्यूबवर 'राहुल देशपांडे ओरिजीनल' ( rahuldeshpandeoriginal ) नावाने चॅनेल आहे. जिथे त्याचे 598K सब्सक्राइबर्स आहेत. दरम्यान, राहुल यांच्या आवाजाचे जितके चाहते आहेत, तितकेच त्यांच्या अभिनयाचे देखील चाहते झाले आहेत. अलिकडेच त्यांचा 'अमलताश' (Amaltash) हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमात त्यांनी स्वतः भूमिका साकारली आहे. 'अमलताश' ही एक हलकीफुलकी लव्हस्टोरी आहे. हा सिनेमा तुम्ही 'राहुल देशपांडे ओरिजीनल' वर पाहू शकता. 

टॅग्स :राहुल देशपांडेयु ट्यूब