Join us

रमेश देव यांचं निधन, ३ दिवसांपूर्वीच त्यांनी उघड केलं होतं एक खास गुपित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 11:11 AM

Ramesh Deo: रमेश देव यांनी ९३वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांनी वाढदिवसादिवशी त्यांचे एक खास गुपित उघड केले होते.

प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Ramesh Deo) यांचे काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. ३० जानेवारी रोजी रमेश देव यांनी ९३वा वाढदिवस साजरा केला होता.त्यांनी वाढदिवसादिवशी त्यांचे एक खास गुपित उघड केले होते.

अभिनेते रमेश देव यांनी त्यांच्या ९३व्या वाढदिवसानिमित्त पुढारीला दिलेल्या मुलाखतीत त्यांचे एक खास गुपित सांगितले. त्यावेळी ते म्हणाले की, फुलं आणि सुंदर मुली हे माझे वीक पॉइंट होते. कॉलेजमध्ये अनेक मुली तुमच्यावर फिदा असतील असे विचारल्यावर रमेश देव यांनी त्यांच्या कॉलेज लाइफमधील त्यांच्या काही आठवणींना उजाळाही दिला. ते म्हणाले होते की, त्यावेळी आतासारखे वातावरण नव्हते, लेडीज रुम वेगळी असायची आणि जेन्ट्स वेगळी. आम्ही पोर्चमध्ये वगैरे उभे राहायचो. त्यामुळे मुली थोड्या लांबच असायच्या.

रमेश देव यांनी केलं १८०हून अधिक चित्रपटात कामरमेश देव यांनी १९५६ साली प्रदर्शित झालेल्या 'आंधळा मागतो एक डोळा' या चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती. त्यांनी १८० हून अधिक मराठी चित्रपटात काम केले. सुवासिनी, माझा होशील का, पडछाया, अपराध, या सुखांनो या, झेप यांसारखे त्यांचे चित्रपट हिट ठरले होते. राजश्री प्रोडक्शनच्या आरती चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. आनंद, खिलौना, कोशिश, जमीर, तीन बहुरानीयाँ याशिवाय बऱ्याच हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले. तसेच त्यांनी काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते.

टॅग्स :रमेश देव