Join us

रांजण या चित्रपटाची सोशलमीडियावर रंगत आहे चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2017 12:34 PM

सध्या रांजण या चित्रपटाची चर्चा फारच गाजत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रेमाला कोणतंही बंधन नसतं असा विचार मांडणारा बहुचर्चित ...

सध्या रांजण या चित्रपटाची चर्चा फारच गाजत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रेमाला कोणतंही बंधन नसतं असा विचार मांडणारा बहुचर्चित रांजण हा चित्रपट आहे. १७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील लागीर झालं रं या गाण्याचा सोशल मीडियात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना यश आणि गौरी ही नवी जोडी पाहायला मिळणार आहे.                      सध्या मराठी चित्रपटसृष्टीत प्रेमकथा असलेले अनेक चित्रपट येत आहेत. शहरी, ग्रामीण पार्श्वभूमीवरच्या वैविध्यपूर्ण कथा पडद्यावर येत आहेत. रांजणमध्येही एका शाळकरी मुलगा आणि मुलगी यांच्यातील प्रेमकथा आहे. मात्र, ही कथा प्रेम, आकर्षण या भावनांच्या पलीकडे जाऊन एक सामाजिक विचार मांडते.  मुलभूत गोष्टींवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. मुलांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोनही त्यातून व्यक्त होतो.       लागीर झालं रं या गाण्यातून यश आणि गौरी ही नवी आणि फ्रेश जोडी चित्रपटसृष्टीला मिळाली आहे. सोशल मीडियात या गाण्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. वैभव जोशी यांनी लिहिलेल्या गाण्याला नरेंद्र भिडे यांनी संगीतबद्ध केलं आहे. अजय गोगावले यांनी त्यांच्या खास शैलीत हे गाणं गायलं आहे. गाण्याचे शब्द, संगीत आणि गाण्याचं चित्रीकरण या विषयी सोशलमीडियालर बरीच चर्चा आहे. श्री महागणपती एंटरटेन्मेंटच्या रवींद्र कैलास हरपळे यांनी रांजण या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर चित्रपटाचं कथा-पटकथा लेखन व दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलं आहे. तर, संवादलेखन प्रकाश पवार व नीलेश भोसले यांचं आहे. रांजण या चित्रपटात शाळेच्या पार्श्वभूमीवर फुलणारी प्रेमकथा आहे.