Join us  

‘रावा जीटी’ ने केल्या शाळेच्या आठवणी ताज्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2016 8:51 AM

‘राव आमचं वेगळं आहे’ असं म्हणणारे ‘रावा’ मेंबर यांचं खरंच वेगळं आहे. धमाल, मस्ती करणारे रावाकरांनी शाळेच्या आठवणी ताज्या ...

‘राव आमचं वेगळं आहे’ असं म्हणणारे ‘रावा’ मेंबर यांचं खरंच वेगळं आहे. धमाल, मस्ती करणारे रावाकरांनी शाळेच्या आठवणी ताज्या करुन उपस्थित रावाकर आणि मान्यवरांना भावूक केले.

नुकतंच रावा जीटीचं म्हणजेच गेट टुगेदरचं चौथे वर्ष दणक्यात पार पडलं. या जीटीची थीम होती ‘शाळेच्या आठवणी’. शाळेच्या आठवणी म्हणजे किती बोलू नि किती नाही अशी गत प्रत्येकाची होते. रावाकरांनी शाळेच्या आठवणीं वर आधारित सादरीकरण उत्तम केलं.

 या जीटी मध्ये ‘येक नंबर’ मालिकेचे कलाकार चिराग पाटील, रेवती लिमये, तन्वी मालपेकर, अभिनेता गौरव घाटनेकर, ‘हाफ तिकीट’ चित्रपटाचे दिग्दर्शक समित कक्कड, बाल कलाकार, निर्माते नानूभाई जयसिंघानी, मोहित जयसिघांनी, ड्रिमिंग ट्वेंटी फोर सेव्हनचे दिपक राणे, पब्लिसिटी डिझायनर सचिन गुरव, अभिनेत्री अमृता खानविलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

शाळेतला आवडत्या बाईंचा वर्ग, संगीत मैफल, नृत्य, अर्थपूर्ण संदेश देणारा स्किट या ३-४ तासांची धमाल म्हणजे ‘रावा जीटी’.