Join us

"देवानं देव चोरला माझा" रतन टाटांच्या निधनानंतर संतोष जुवेकरची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 11:17 AM

मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर करत रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Ratan Tata Passes Away : टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि जगातील मोठे उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी (9 ऑक्टोबर) निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने केवळ उद्योगजगतावर नव्हे तर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.सामान्य जनतेपासून, राजकीय नेते ते कलाकार सगळेच त्यांच्या निधनानंतर हळहळले आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर करत रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आता अभिनेता संतोष जुवेकरने शोक व्यक्त केला.

संतोष जुवेकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रतन टाटा यांचा प्रवास पाहायला मिळतोय. कॅप्शनमध्ये त्याने लिहले, "देवानं देव चोरला माझा. माणसातला देव माणूस गेला. आज देवानं त्याचा देव्हारा मांडलाय. आज स्वर्गात आहे घटस्थापना", या शब्दात संतोषने दु:ख व्यक्त केलं आहे. 

फक्त संतोष जुवेकरचं नाही तर अभिनेता प्रसाद ओक, लेखक क्षितीज पटवर्धन, अभिनेता कुशल बद्रिके यांच्यासह अनेक कलाकारांनी दु:ख व्यक्त केलं आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर कोट्यवधी भारतीयांच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळत आहे.  बुधवारी संध्याकाळी रतन टाटा यांची प्रकृती जास्त खालावली. प्रकृती खालावल्यामुळे रतन टाटा यांना ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

टॅग्स :संतोष जुवेकररतन टाटा