Join us

"फोनमधील ‘कॉन्टॅक्ट’ जेव्हा अचानक निघून जातात...", एकामागोमाग एक मराठी कलाकारांच्या निधनाने रवी जाधव भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 13:40 IST

गेल्या काही महिन्यांत मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी कलाकारांच्या निधनाने पोकळी निर्माण झाली आहे. अतुल परचुरे, विजय कदम आणि मंगेश कुलकर्णी या कलाकारांच्या निधनानंतर दिग्दर्शक रवी जाधव यांनी भावुक पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना मांडल्या आहेत. 

मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचं १४ ऑक्टोबरला निधन झालं. काही वर्षांपूर्वीच त्यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यांनी कर्करोगावर मातही केली होती. मात्र, अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. अतुल परचुरे यांच्या अचानक झालेल्या निधनाने सेलिब्रिटींबरोबरच चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. अतुल परचुरेंच्या निधनानंतर काहीच दिवसांनी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार मंगेश कुलकर्णी यांचंदेखील निधन झालं. तर काही महिन्यांआधी विजय कदम यांचंही कॅन्सरने निधन झालं. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीची मोठी हानी झाली आहे. 

गेल्या काही महिन्यांत मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी कलाकारांच्या निधनाने पोकळी निर्माण झाली आहे. अतुल परचुरे, विजय कदम आणि मंगेश कुलकर्णी या कलाकारांच्या निधनानंतर दिग्दर्शक रवी जाधव यांनी भावुक पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना मांडल्या आहेत. 

रवी जाधव यांची पोस्ट 

 

मोबाईल मधील कॉन्टॅक्ट नंबर मधील ‘कॉन्टॅक्ट’ जेव्हा अचानक आपल्यातून निघून जातात तेव्हा आपल्याकडे केवळ त्यांचे नंबर राहतात.

नंबर्सच्या या जगात आपण एकामागून एक बरेच ‘एक नंबर’ कलाकार गमावत आहोत याची आठवण करुन देत राहतात.

अतुल परचुरे, विजय कदम आणि मंगेश कुलकर्णी या तीनही महान कलाकारांना भावपूर्ण श्रद्धांजली 

अतुल परचुरेंच्या अचानक झालेल्या निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्याबरोबरच्या आठवणी शेअर केल्या. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अतुल परचुरेंच्या निधनानंतर अभिनेत्याची पत्नी सोनिया परचुरे यांना भावनिक पत्र लिहून सांत्वन केलं होतं.   

टॅग्स :अतुल परचुरेरवी जाधव