Join us

रवी जाधव यांचा मैत्रा समभाव लघुपट उत्सावात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2016 1:54 PM

आंतरराष्ट्रीय पातळीवर साजºया करण्यात येणाºया महिला-हिंसाचारविरोधी पंधरवडया निमित्ताने मॅन अगेन्स व्हॉयलेंन्स अ‍ॅण्ड अब्युज या संस्थेने समभाव लघुपट आयोजित करण्यात ...

आंतरराष्ट्रीय पातळीवर साजºया करण्यात येणाºया महिला-हिंसाचारविरोधी पंधरवडया निमित्ताने मॅन अगेन्स व्हॉयलेंन्स अ‍ॅण्ड अब्युज या संस्थेने समभाव लघुपट आयोजित करण्यात आला होता. हा उत्सव दोन दिवसांचा असतो. या उत्सवामध्ये वेगवेगळ्या देशातील आणि भाषेतील लघुपट प्रदर्शित करण्यात आले होते. या लघुपटांची सुरूवात अरविंद व्ही.के यांच्या ब्रोकन द इमेज या तमिळ भाषेतील लघुपटाने झाली. व्यवसाय की माणुसकी महत्त्वाची असा प्रश्न उभा करणाºया या लघुपटात एका छायाचित्रकार पत्रकाराची कथा सांगण्यात आली आहे. पत्रकारितेत बातमीच्या मागे धावत असताना एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचविणे शक्य आहे हे भान विसरले जाते. या मर्मावर बोट ठेवणारा हा लघुपट प्रेक्षकांना भावला. तसेच आज स्त्री शिक्षित, कर्तृत्ववान झाली आहे. नोकरीपेक्षाही करिअरच्या दृष्टीने विचार करणाºया  स्त्रियांची संख्या अधिक आहे. मात्र स्त्री सक्षमीकरणासाठी, समानतेसाठी इतकं पुरेसं आहे का? आज एकटेपणाने भटकंती करणाºया स्त्रियांची संख्या किती आहे, स्त्रीच्या शरीरावर रेंगाळणाºया पुरुषांच्या नजरा किती त्रास देतात याची पुरुषांना खरंच कल्पना नसते का? अशा वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे लघुपट प्रेक्षकांना पाहायला मिळाले. त्याचबरोबर या लघुउत्सावात रवी जाधव यांच्या मैत्रा हा लघुपटदेखील दाखविण्यात आला आहे. या लघुपटात समलैंगिकतेबद्दलचे भाष्य करण्यात आले आहे. तसेच विजय तेंडुलकरांनी लिहिलेल्या मित्राची गोष्ट या कथेचे लघुपटात रूपांतर करण्यात आले आहे. सर्वात शेवटी मर्दिस्तान या लघुपटात ४ पुरुषांच्या वेगळ्या विचारांना वाट करून देण्यात आली आहे. या पंधरवाडयाला २६ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली आहे. यामध्ये देशभरातील २३ स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. दरवर्षी एखादी मध्यवर्ती कल्पना घेऊन जागतिक ते स्थानिक पातळीवर जनजागृतीपर मोहीम राबवल्या जातात. या पंधरवडयाची  सुरुवात सेंटर फॉर विमेन्स ग्लोबल लिडरशीप या अमेरिकेतील संस्थेने १९९१ साली एका परिषदेपासून केली. तसेच आता या पंधरवाडयाला २६ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली आहे. यामध्ये देशभरातील २३ स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. दरवर्षी एखादी मध्यवर्ती कल्पना घेऊन जागतिक ते स्थानिक पातळीवर जनजागृतीपर मोहीम राबवल्या जातात.