मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांचं १५ जुलैला निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. रवींद्र महाजनी हे कुटुंबापासून दूर तळेगावयेथील आंबी गावातील एक फ्लॅटमध्ये एकटेच राहत होते. दोन दिवसांआधीच त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली होती. त्यांच्या निधनानंतर एवढे मोठे अभिनेते असूनही एकटे का राहत होते? त्यांना दोन दिवस कुणीही फोन केला नाही का? अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत होत्या. यावर रवींद्र महाजनींचा लेक आणि सुप्रसिद्ध अभिनेता गश्मीरने भाष्य करत पोस्ट शेअर केली होती.
वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियाद्वारे गश्मीर व्यक्त झाला. इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत त्याने “कलाकाराला कलाकाराप्रमाणे राहू द्या. आम्हीही शांत राहून या गोष्टीची काळजी घेऊ. असं केल्याने माझ्याबद्दल द्वेष वाटत असेल, मला शिव्या दिल्या जात असतील तर ते मला मान्य आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. ते माझे वडील आणि माझ्या आईचे पती होते. तुमच्या कोणापेक्षाही आम्ही त्यांना जास्त ओळखायचो. योग्य वेळ आल्यावर मी याबाबत भाष्य करेन,” असं म्हटलं होतं.
मणिपूरमधील महिला अत्याच्याराच्या व्हिडिओवर अक्षयची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाला, “गुन्हेगारांना...”
पोर्नोग्राफी प्रकरणावर राज कुंद्रा बनवणार चित्रपट, तुरुंगात ६३ दिवसांत नेमकं काय घडलं?
गश्मीरची ही पोस्ट मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने शेअर केली आहे. मृण्मयीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये गश्मीर पोस्ट शेअर करत “आम्ही तुझ्याबरोबर आहोत,” असं म्हटलं आहे. दरम्यान, गश्मीर आणि रवींद्र महाजनी यांच्या नात्यात दुरावा असल्याचं बोललं जात होतं. गश्मीरने सोशल मीडियावर वडिलांबरोबरचा एकही फोटो शेअर न केल्याने त्याला ट्रोलही केलं गेलं होतं.