Join us

रसिका सुनिलने केले फोटोशूट मात्र अशी होते तुलना, पाहा तिचे भन्नाट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 14:43 IST

सध्या तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती कधी अॅनिमल प्रिंटमध्ये असलेल्या ड्रेसमध्ये तर कधी बिकनी लूकमध्ये पाहायला मिळते.

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेमुळे घराघरात पोहचलेली अभिनेत्री रसिका सुनिलचे दर्शन रसिकांना होत नसले तरी सोशल मीडियावर मात्र ती धुमाकुळ घालत असते. नुकतेच तिने एक भन्नाट फोटोशूट केले आहे.अनेक वेळा बॉलिवूडच्या कलाकारांना त्यांच्या फॅशन एक्सपेरिमेंटविषयी ट्रोल केले जाते. मात्र या गोष्टींमुळे त्यांना अजिबात फरक पडत नसल्याचे पाहायला मिळते. आता असाच ट्रेंड मराठीतही पाहायला मिळत आहे. अनेक मराठी कलाकारा आता त्यांच्या ड्रेसिंगमुळे ट्रोल होत असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच रसिका सुनिलवरही नेटक-यांनी निशाणा साधला आहे.सध्या तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती  कधी अॅनिमल प्रिंटमध्ये असलेल्या ड्रेसमध्ये तर कधी बिकनी लूकमध्ये पाहायला मिळते. 

तिच्या प्रत्येक अदा चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. तसेही अल्पावधीतच भूमिकेप्रमाणे बोल्ड फॅशन स्टाईल असलेली अभिनेत्री म्हणूनही ती ओळखली जाते. तिचे फोटो पाहून फिदा होत असतात.  मात्र आता एका फोटोमुळे सोशल मीडियावर तिची खिल्ली उडवली जात आहे.हा फोटो पाहून युजर्स जिराफ प्रमाणे भासत असल्याचे म्हटले आहे.  या भन्नाट फोटोशूटमुळे रसिका सुनिल सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत असल्याचे  पाहायला मिळत आहे. 

 

पुढील शिक्षणासाठी रसिका अमेरिकेत गेली आहे. तिथे ती शिक्षणासोबत विविध गोष्टी करताना पहायला मिळते. ती सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना तिथले अपडेट्स देत असते. नुकतेच तिने स्कुबा डायविंगचे प्रशिक्षण घेतले आणि तिला स्कुबा डायविंगचचे प्रमाणपत्र देखील मिळाले. त्यामुळे आता ती जगात कुठेही स्कुबा डाइव करू शकते. स्कुबा डायविंगच्या कोर्सनंतर रसिकाला व्रेक डायविंग आणि नाईट डायविंगचेही प्रशिक्षण घ्यायचे आहे आणि ती लवकरच घेणार असल्याचे ती सांगते.

टॅग्स :रसिका सुनिल