Join us

मृत्यूच्या अवघ्या काही तास आधी काम करत होत्या रिमा लागू, घरी गेल्या अन् काही वेळातच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 12:50 IST

अभिनेत्री रिमा लागू यांच्या अकाली एक्झिटने मराठीच नाही हिंदी चित्रपटसृष्टीलाही धक्का बसला होता.

आपल्या दमदार अभिनयाने रंगभूमी, मालिका आणि रुपेरी पडदा गाजवणाऱ्या अभिनेत्री रिमा लागू यांच्या अकाली एक्झिटने मराठीच नाही हिंदी चित्रपटसृष्टीलाही धक्का बसला होता. बॉलिवूडमध्ये त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये साहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली. पण त्यांना प्रेमळ आईच्या भूमिकेने वेगळी ओळख मिळवून दिली. मराठीच्या बरोबरीने हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये भक्कम पाय रोऊन उभे राहणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये त्यांचा समावेश होत होता. त्यांचे निधन १८ मे २०१७ ला हृदय विकाराच्या झटक्याने झाले.

रिमा लागू याांनी आपल्या करियरची सुरूवात मराठी चित्रपटातून केली होती. कित्येक वर्ष त्यांनी मराठी नाटकात काम केले. त्यानंतर त्यांनी बॉलिवूड व मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. रिमा यांनी हम साथ साथ है, कुछ कुछ होता है, मैंने प्यार किया व कल हो ना हो यांसारख्या चित्रपटात भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केलंय.

चित्रपटांशिवाय रिमा लागू खऱ्या आयुष्यात मॉर्डन आई होती. चित्रपटात काम करीत असताना त्यांची प्रसिद्ध मराठी अभिनेते विवेक लागू यांच्याशी भेट झाली. त्यानंतर काही वर्षांनंतर रिमा लागू व विवेक लागू यांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगी आहे जिचं नाव मृण्मयी आहे. मृण्मयी नाटक व चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे. यासोबत ती थिएटर दिग्दर्शकदेखील आहे. लग्नानंतर काही काळ सगळं सुरळीत चालू असताना रिमा व त्यांच्या नवऱ्यामध्ये मतभेद व्हायला लागले आणि अखेर काही वर्षांनंतर ते विभक्त झाले. 

नवऱ्यापासून वेगळं झाल्यानंतर रिमा यांनी पुन्हा लग्न केलं नाही आणि एक सिंगल आई बनून त्यांनी आपल्या मुलीचे पालन पोषण केलं. स्वतःला व त्यांच्या मुलीला यातून सावरण्यासाठी रिमा यांनी जी-तोड मेहनत केली. त्यांनी मुलीला कोणतीही कमतरता जाणवू दिली नाही. एक सिंगल मदर असतानाही त्यांनी मुलीला स्वतःच्या पायावर उभं केलं.

रिमा लागू मृत्यूच्या काही तास आधीपर्यंत शूट करत होत्या. संध्याकाळी त्या घरी परतल्या आणि  मध्यरात्री त्यांच्या छातीत दुखू लागले आणि रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. रीमा लागू यांनी तिच्या कारकीर्दीत 95 हून अधिक चित्रपट काम केले आणि बर्‍याच टीव्ही कार्यक्रमांमध्येही त्या दिसल्या. तू तू मैं और श्रीमती या मालिका त्यांच्या हिट ठरल्या. 

टॅग्स :रिमा लागू