रीना अगरवाल जागा घेणार का माधुरी दीक्षितची?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 05:54 PM2018-10-10T17:54:29+5:302018-10-10T17:55:04+5:30

बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित ही ‘पीएनजी गाडगीळ’ची ब्रँड ऍम्बॅसेडर आहे. माधुरी दीक्षितने पीएनजी गाडगीळच्या ‘टाईमलेस डायमंड्स बाय माधुरी’या अंतर्गत असलेल्या डायमंडच्या डिझाईन्स लॉन्च केल्या. आता सर्वत्र अशी चर्चा आहे की माधुरी नंतर हिंदी-मराठी अभिनेत्री रीना अगरवाल ‘पीएनजी गाडगीळ’ची ब्रँड ऍम्बॅसेडर बनणार आहे.

Reena Aggarwal will be new brand ambassador of PNG gadgil? | रीना अगरवाल जागा घेणार का माधुरी दीक्षितची?

रीना अगरवाल जागा घेणार का माधुरी दीक्षितची?

googlenewsNext

प्रत्येक स्त्रीला आकर्षण असते दागिन्यांचे आणि या वाक्याशी अनेकजण सहमत असतील. ग्राहकांच्या सर्वप्रथम पसंतीस पडणारे सराफ म्हणजे पीएनजी गाडगीळ. ग्राहकांची आवड-निवड अगदी बारकाईने जपून त्यांना आवडतील असे आणि त्यांना शोभतील असे दागिन्यांमधील डिझाईन्स बनवून पीएनजी गाडगीळ हा सुप्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड बनला आहे. सर्वांची आवडती मराठमोळी आणि बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित ही ‘पीएनजी गाडगीळ’ची ब्रँड ऍम्बॅसेडर आहे. माधुरी दीक्षितने पीएनजी गाडगीळच्या ‘टाईमलेस डायमंड्स बाय माधुरी’या अंतर्गत असलेल्या डायमंडच्या डिझाईन्स लॉन्च केल्या. आता सर्वत्र अशी चर्चा आहे की माधुरी नंतर हिंदी-मराठी अभिनेत्री रीना अगरवाल ‘पीएनजी गाडगीळ’ची ब्रँड ऍम्बॅसेडर बनणार आहे.

या चर्चेचे कारण असे की, अभिनेत्री रीना अगरवालने ‘पीएनजी गाडगीळ’साठी फोटोशूट केलं आहे. प्रिंट आणि होर्डिंग्ससाठी असणारे हे फोटोशूट मुंबई आणि पुणे शहरांसाठी आहे. महाराष्ट्रातील स्त्रियांचा आवडता पेहराव म्हणजे साडी आणि त्यातही विशेष म्हणजे पैठणी. भर जरी पैठणीवर शोभून दिसेल असे दागिने आणि नवनवीन डिझाईन्स ग्राहकांसाठी आणण्याची कल्पना पीएनजी गाडगीळ यांना सुचली आणि महिलांची आवड लक्षात घेता लवकरच ते नवीन कलेक्शन ग्राहकांसाठी उपलब्ध करणार आहेत. तर पैठणी साड्यांसाठी पीएनजीचे नक्षी कलेक्शनच्या जाहिरातीसाठी पीएनजी गाडगीळनी आपल्या मराठमोळ्या रीना अगरवालला प्राधान्य देऊन तिच्यासोबत असोशिएट झाले. आणि याच निमित्ताने रीनाचा चाहता वर्ग रीना अगरवाल पीएनजी गाडगीळची ब्रँड ऍम्बॅसेडर बनावी अशी आशा नक्कीच करत असेल.

‘पीएनजी गाडगीळ’सोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी रीना अगरवाल सांगते, “पी. एन. गाडगीळ आणि माझे कुटुंब यांचे खूप जुने नातेसंबंध आहे. सणासुदीला किंवा घरातील कार्यक्रमाला सोन्याची खरेदी म्हटली की, माझ्या कुटुंबातील सदस्यांनी नेहमीच ‘पीएनजी गाडगीळ’ला सर्वप्रथम प्राधान्य दिले आहे आणि याचे एकमेव कारण म्हणजे माझा आणि माझ्या कुटुंबाचा ‘पीएनजी गाडगीळ’वर असलेला विश्वास. त्यामुळे लहानपणापासून माझं स्वप्न किंवा मनात एक इच्छा कायम होती की ‘पीएनजी गाडगीळ’साठी काम करण्याची संधी मिळावी आणि ‘नक्षी कलेक्शन’ मुळे माझी ही इच्छा पूर्ण झाली. नुकतेच मी ‘पीएनजी गाडगीळ’च्या नवीन नक्षी कलेक्शनसाठी फोटोशूट केलं आहे आणि ते स्त्रियांच्या पसंतीस नक्की पडेल.”

Web Title: Reena Aggarwal will be new brand ambassador of PNG gadgil?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.