गावखेड्यातल्या नदीकाठच्या निसर्गसौंदर्य धरतीवर काही मुलांचा खेळ रंगला आहे. 'रंग भारी रे रंगणार' म्हणत रंगलेला हा कबड्डीचा खेळ आणि सोबतच रंगपंचमीच्या रंगांची उधळण पाहताना रसिकही त्यात समरसून जातील यात काही शंका नाही. 'सूर सपाटा'ची मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चा चांगलीच रंगलेली असताना, आता त्यातील एका गाण्याने या उत्सुकतेमध्ये आणखी भर घातली आहे.
'सूर सपाटा'मधील 'रंग भारी रे... रंगणार' हे गीत मंगेश कांगणे लिहिले असून त्याला संगीत अभिनय जगताप यांचे असून आदर्श शिंदेच्या खड्या आवाजातील या गाण्याला प्रियांका बर्वेच्या सुमधुर आवाजाचीही किनार लाभली आहे. या गाण्यातील होलिकोत्सव पाठोपाठच येणाऱ्या रंगपंचमीच्या सणाचे मनमोहक चित्रण मनाला भुरळ पाडणारे झाले आहे ज्याचे नृत्यदिग्दर्शन राजेश बिडवे यांनी केले आहे. लाडे ब्रोज् फिल्म्स प्रा. लि प्रस्तुत जयंत लाडे निर्मित आणि मंगेश कंठाळे दिग्दर्शित 'सूर सपाटा' २२ मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात असलेला मराठीतील दिग्ग्ज कलावंताचा ताफा. दिग्दर्शक संजय जाधव, उपेंद्र लिमये, अभिज्ञा भावे ही त्यातली काही नावं जी अलीकडेच उलगडण्यात आली आहेत. शिवाय उनाड पण कुशल कबड्डीपटूंच्या भूमिकेतील हंसराज जगताप, यश कुलकर्णी, चिन्मय संत, सुयश शिर्के, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन कळारकर, यांसोबतच शरयू सोनावणे आणि निनाद तांबावडे आदींच्या प्रमुख भूमिका 'सूर सपाटा'मध्ये आपल्याला पहायला मिळतील. प्रकाश नाथन, हिमांशू आशेर, संजय पतोडीया,अर्शद कमल खान प्रस्तुत, किशोर खिल्लारे, सुभाष गुप्ता, सतीश गुप्ता आणि जगदीश लाडे सहनिर्मित 'सूर सपाटा'ची कथा मंगेश कंठाळे यांची असून पटकथा मंगेश कंठाळे व अमित बैचे यांची आहे. तर संवादलेखन अमित बैचे यांनी केले आहे. चित्रपटाचा सिनेमॅटोग्राफी विजय मिश्रा यांचे आ