गणू चित्रपटातील कलाकार रमले कॉलेजच्या आठवणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2016 04:08 PM2016-12-25T16:08:19+5:302016-12-25T16:08:19+5:30
सध्या मराठी चित्रपट, मालिका आणि नाटक यांचे प्रमोशन फंडे खरचं लाजवाब असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे आता सोशलमीडिया असल्यामुळे ...
स ्या मराठी चित्रपट, मालिका आणि नाटक यांचे प्रमोशन फंडे खरचं लाजवाब असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे आता सोशलमीडिया असल्यामुळे हे प्रमोशन फंडे अत्यंत सोप्या आणि सोईस्कररीत्या प्रेक्षकांपर्यत पोहचत असल्याचे पाहायला मिळत असतात. आता हेच पाहा ना,महाविदयालयांमध्ये डिसेंबर महिना उजाडला की, विविध डेज सुरू होतात. या डेजमध्ये महाविदयालयात न येणारे मंडळीदेखील आवुर्जुन हजेरी लावत असतात. त्यामुळे हे सर्व महाविदयालय मोठया संख्येने फुलून निघालेले असतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन गणू या चित्रपटाच्या टीमने प्रमोशनसाठी थेट महाविदयालयच गाठले. जोगेश्वरी येथील गुरुनानक खालसा कॉलेजमध्ये ही टीम उपस्थित राहिली. तसेच युथला त्यांच्या नजराणा फेस्टसाठी प्रोत्साहन देण्यासाठी गणू या आगामी मराठी चित्रपटाची टीमने हजेरी लावली होती. या चित्रपटामध्ये अभिनेते अशोक कुलकर्णी आणि अभिनेत्री मोनालिसा बागल उपस्थित होती. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रितम अभंग यांनी केले असून निर्मातेची जबाबदारी चेतन नकते यांनी पार पाडली. तसेच या चित्रपटाच्या कलाकारांनीदेखील यावेळी आपल्या कॉलेजच्या दिवासांना उजाळा दिला आहे. कॉलेज डेज, तेव्हा केलेली मस्ती, तो कट्टयावर चहा, बंक केलेली लेक्चर्स अशा सर्व गंमतीशीर आठवणी त्यांनी विद्यार्थ्यांबरोबर शेअर केल्या आहे. मोनालिसा बागल हिचा झाला बोभाटा हा आणखी एक आगामी चित्रपट प्रदर्शनास सज्ज झाला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत मयुरेश पेम झळकणार आहे. तसेच या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, भाऊ कदम, कमलेश सावंत, दिपाली आंबिकार, तेजा देवकर आदि कलाकारांचा समावेश आहे. त्यामुळे या नवीन वर्षाच्या सुरूवातीला अभिनेत्री मोनालिसा बागलचे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार हे मात्र नक्की.