Join us

रवी जाधवने आठवण म्हणून १९८० सालातील 'ही' वस्तू ठेवलीय जपून, काय आहे ही वस्तू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 1:36 PM

प्रत्येकाच्या आयुष्याच चांगल्या वाईट आठवणी असतात. तर कुणी वस्तूरुपी आठवण जपून ठेवते तर कुणी आपल्या मनाच्या कोपऱ्यात आठवणी जपून ठेवतात. अशाच आपल्या एका आठवणीबद्दल मराठीतील आघाडीचा दिग्दर्शक व अभिनेता रवी जाधवने सोशल मीडियावर शेअर केले

प्रत्येकाच्या आयुष्याच चांगल्या वाईट आठवणी असतात. तर कुणी वस्तूरुपी आठवण जपून ठेवते तर कुणी आपल्या मनाच्या कोपऱ्यात आठवणी जपून ठेवतात. अशाच आपल्या एका आठवणीबद्दल मराठीतील आघाडीचा दिग्दर्शक व अभिनेता रवी जाधवने सोशल मीडियावर शेअर केले. त्याची ही आठवण तुम्हाला समजल्यावर तुम्हाला त्याचे कौतूक वाटेल.

रवी जाधव सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. तो नेहमी इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या गोष्टींचे फोटो टाकत असतो. आता त्याने एका जुन्या काळातील स्कूटरचा फोटो टाकला आहे. या स्कूटरसोबत त्याच्या खूप आठवणी आहेत. त्याने हा फोटो शेअर करीत लिहिले की, चांगल्या आठवणी कितीही जुन्या झाल्या तरी त्यांना भंगारात टाकायच्या नसतात... त्या हृदयात सजवून आयुष्यभर जपायच्या असतात. मी माझ्या वडिलांची १९८० ची स्कूटर (बजाज चेतक) अशीच सजून धजून माझ्या घरी जपली आली. मला प्रेरणा द्यायला. सतत माझ्या सोबत रहायला.

रवी जाधवने आठवण म्हणून ठेवलेली वस्तू पाहिल्यानंतर व त्याच्या या मागच्या भावना समजल्यावर तुम्हालाही रवी जाधवचे कौतूक वाटत असेल ना.

रवी जाधव रंपाट हा आगामी सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओ आणि रवी जाधव मिळून करणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव करत आहे. रवी जाधव त्यांच्या या नव्या प्रोजेक्टसाठी खूपच उत्सुक असल्याचे कळतेय. या चित्रपटात कलाकार कोण असणार किंवा या चित्रपटाची कथा काय असणार याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही.

टॅग्स :रवी जाधव