Join us

या अभिनेत्री आहेत रेणुका शहाणेच्या बेस्ट फ्रेंड्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2018 8:00 AM

रेणुका शहाणेने पोस्ट केलेल्या एका फोटोने तिच्या फॅन्सचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. कारण या फोटोद्वारे तिने तिच्या बेस्ट फ्रेंड्स कोण आहेत हे तिच्या फॅन्सना सांगितले आहे. 

रेणुका शहाणे आज अनेक वर्षं मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीचा भाग आहे. तिने आजवर चित्रपटांसोबतच मालिकांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. सैलाब, इम्तिहान, सर्कस यांसारख्या तिच्या अनेक मालिका गाजल्या आहेत. हम आपके है कौन या चित्रपटातील तिने साकारलेल्या पूजा या व्यक्तिरेखेच्या तर प्रेक्षक प्रेमातच पडले होते. रेणुका एक चांगली अभिनेत्री असण्यासोबतच एक चांगली दिग्दर्शिका आहे. तिने दिग्दर्शित केलेल्या रिटा या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. 

रेणुका शहाणे सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटद्वारे ती आपल्या फॅन्सशी नेहमीच गप्पा मारते. तसेच अनेक सामाजिक प्रश्नांवर देखील या माध्यमाद्वारे आवाज उठवते. यासोबतच आपल्या कुटुंबियांचे, मित्रमैत्रिणींचे फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकत्याच तिने पोस्ट केलेल्या एका फोटोने तिच्या फॅन्सचे चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे. कारण या फोटोद्वारे तिने तिच्या बेस्ट फ्रेंड्स कोण आहेत हे तिच्या फॅन्सना सांगितले आहे. 

रेणुकाने नुकताच अभिनेत्री निर्मिती सावंत आणि प्रतिक्षा लोणकर यांच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने एक खूपच छान कॅप्शन लिहिली आहे. तिने म्हटले आहे की, आमच्या मैत्रीला २६ वर्षांहून अधिक काळ लोटलेला आहे. आम्ही बारीक असण्यापासून ते जाड झाल्यापर्यंत एकमेकांना पाहत आहोत. या दोघी माझ्या सगळ्यात चांगल्या मैत्रिणी नेहमीच राहातील. तुमच्यावर माझे खूप प्रेम असून तुम्ही माझ्या आयुष्यात आहात यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. जीवनात ही घडी अशीच राहू दे...

रेणुका शहाणे, निर्मिती सावंत आणि प्रतिक्षा लोणकर या तिघीही अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्रात कार्यरत आहेत. त्या तिघींनी देखील मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये देखील खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनयचे नुकतेच लग्न झाले. या लग्नाला देखील रेणुकाने आवर्जून उपस्थिती लावली होती.

रेणुकाने तिच्या मैत्रिणींसोबत शेअर केलेला हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला असल्याचे त्यांनी दिलेल्या कमेंटवरून आणि लाइक्सवरून कळून येत आहे. 

 

टॅग्स :रेणुका शहाणे