Join us

'द राईट वन' सिनेमातून हटके प्रेमाची कहाणी रसिकांच्या भेटीला, ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 6:53 PM

'द राईट वन' आता एमएक्स प्लेयरवर बघायला उपलब्ध आहे.

दिग्दर्शक सागर लाधे यांच्या 'द राईट वन' चा प्रीमियर नुकताच एमएक्स प्लेयरवर झाला आहे, या चित्रपटात 'द बिग बुल' फेम लेखा प्रजापती आणि मराठीतील गाजलेली मालिका 'काहे दिया परदेस' यातील ऋषी सक्सेना यांची मुख्य भूमिका आहे. आजकालच्या डिजिटल युगात लग्न ठरण्याची प्रथा बदलली आहे. डेटिंग अँप्स च्या जमान्यात अरेंज मॅरेज ला तरुणाईची फारशी पसंती नसते. या विषयवार भाष्य कारण्यारे या फिल्ममध्ये दिशांत आणि अवनी या दोन तरुणांची कहाणी बघायला मिळते. अरेंज मॅरेज बद्दल असणारी त्यांची अनिच्छा, संभ्रम याला एका मनोरंजक प्रतीने दर्शवण्यात आले आहे. लग्न ठरण्याच्या पद्धती पेक्षा योग्य जोडीदार मिळने  महत्वाचे आहे, हे या चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न झाला आहे. 

 दिग्दर्शक सागर लाधे फिल्मच्या बद्दल बोलताना म्हणाले  "हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही खूप उत्सुक होतो. तरुण प्रेक्षांची या चित्रपटाला मिळालेल्या पसंतीने आम्ही खूप आनंदित आहोत. दिग्दर्शक म्हणून अशा कधिक चित्रपट बनवण्याची प्रेरणा आम्हाला यातून मिळते." नुकताच रिलीज  झालेल्या अभिषेक बच्चन स्टारर 'द बिग बुल' मधील अभिनेत्री लेख प्रजापती म्हणाल्या, "चित्रपटामध्ये काम करण्याचा अनुभव खूप  मजेदार होता. आम्हाला मिळालेल्या प्रेमाबद्दल आम्ही प्रेक्षकांचे आभारी आहोत. दिग्दर्शक सागर लाधे सोबत काम करण्याचा अनुभल देखील इंटरेस्टिंग होता. त्याला कथेची आणि फिल्म ची जाण खूप चांगली आहे. मी अशा करते  की आम्ही अशेच चित्रपट प्रेक्षकांसाठी आणत राहू." 

मराठीतील गाजलेल्या मालिका 'काही दिया परदेस मधील अभिनेता ऋषी सक्सेना म्हणाला "मी खरंच आनंदी आहे की मला या चित्रपटासोबत जुडण्याची संधीची मिळाली. मी दिशांत च्या व्यक्तरेखेशी बराच कनेक्टेड होतो. सागर हा खूप टॅलेंटेड दिग्दर्शक आहे आणि त्याने दिशांतच्या व्यक्तिरेखेला पूर्णपणे न्याय दिला आहे. हा चित्रपट अधिक लोकांपर्यंत पोहचतो हीच आमची प्रामाणिक आशा."

 फिल्मच्या यशानंतर निर्मात्यांनी आता दिग्दर्शक व निर्माते  याचा  दुसरा भाग  बनवण्याबाबत विचार केला आहे.दिग्दर्शक सागर लाधे यांच्या दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती चंद्रकांत हिरे आणि ब्लॅकबोर्ड मोशन पिक्चर्स यांनी केली आहे, तर विश्वेश वैद्य यांनी या चित्रपटावर मनमोहक संगीत दिले आहे. संवाद आणि पटकथा समीर मानेकर यांनी लिहिली आहेत आणि अक्षय राणे यांनी छायाचित्रण केले आहे. 'द राईट वन' आता एमएक्स प्लेयरवर बघायला उपलब्ध आहे. 

टॅग्स :ऋषी सक्सेना