Join us

अरिजीत सिंहच्या कॉन्सर्टमध्ये उड्या मारताना दिसली रिंकू राजगुरू; अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 13:47 IST

अरिजीत सिंहची जबरा फॅन आहे रिंकू राजगुरू, कॉन्सर्टमधील व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांचे कान तृप्त करणारा बॉलिवूड गायक म्हणजे अरिजीत सिंह. त्याने अनेक सुपरहिट गाणी बॉलिवूडला दिली आहेत. त्याच्या गाण्याचे लाखो चाहते आहेत. अरिजीतच्या कॉन्सर्टलाही चाहते गर्दी करताना दिसतात. मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरूदेखीलअरिजीत सिंहची फॅन आहे. रिंकूने नुकत्याच झालेल्या अरिजीतच्या कॉन्सर्टला हजेरी लावली होती. 

रिंकूने अरिजीतच्या कॉन्सर्टमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत स्टेजवर अरिजीत गाताना दिसत आहे. तर त्याला गाताना पाहून रिंकूचा आनंद गगनात मावेनासा झाला. अरिजीतला स्टेजवर लाइव्ह गाताना पाहून रिंकू उड्या मारत असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. पहिल्यांदाच अरिजीत सिंहच्या कॉन्सर्टला हजेरी लावल्याचं रिंकूने पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्याबरोबर व्हिडिओत अभिनेत्री गौरी इंगावलेही दिसत आहे. रिंकूच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

दरम्यान, 'सैराट'मधून प्रसिद्धीझोतात आलेली रिंकू नंतर अनेक सिनेमांमध्ये दिसली. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा २' सिनेमात रिंकूने महत्त्वाची भूमिका साकारली होती. रिंकूने हिंदी सिनेमांतही काम केलं आहे. 'हल्ला बोल' आणि 'झुंड' या सिनेमात रिंकू झळकली आहे. 

टॅग्स :रिंकू राजगुरूअरिजीत सिंहसेलिब्रिटी