सैराट (Sairat Movie) चित्रपटातून अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru)ला खूप लोकप्रियता मिळाली. आर्ची या नावाने ती महाराष्ट्रात ओळखली जाते. सैराट चित्रपटानंतर तिने कधी मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर तिने मराठी चित्रपट आणि हिंदी वेबसीरिजमध्ये काम केले. रिंकू राजगुरू तिच्या आगामी प्रोजेक्टसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. दरम्यान नुकतीच रिंकू मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्यासोबत डिनर डेटला गेली होती. त्याच्यासोबतचे फोटो तिने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले. त्यानंतर तिचे त्याच्यासोबत अफेयर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
रिंकू राजगुरूने इंस्टाग्रामवर सैराटमधील तिचा सहकलाकार आकाश ठोसर (Aakash Thosar)सोबतचे फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की डिनर डेट. तर तोच फोटो आकाश ठोसरने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिले की, खूप खाल्लं यार. उद्या जरा जास्त कार्डिओ करायला लागणार. तसेच रिंकू राजगुरूने आकाश ठोसरने तिचा तिच्या गाडीतला व्हिडीओ पोस्ट केलेला शेअर करून लिहिले की, लवकरच पुन्हा भेटू.
आगामी प्रोजेक्ट्सरिंकू राजगुरू सैराटनंतर मेकअप, कागर या मराठी चित्रपटात तर १००, अनपॉज्ड, २०० हल्ला हो या वेबसीरिजमध्ये झळकली आहे. त्यानंतर आता ती छुमंतर या मराठी चित्रपटात दिसणार आहे. तर आकाश ठोसर एफ यू- फ्रेंडशीप अनलिमिटेड या चित्रपटात झळकला आहे. तसेच तो लस्ट स्टोरीज, १९६२ द वॉर इन दी हिल्स या सीरिजमध्ये दिसला आहे. यानंतर आता तो घर, बंदुक बिर्यानी या चित्रपटात झळकणार आहे.