Join us

रिंकु राजगुरूने S.S.C Results मध्ये मारली बाजी,जाणून घ्या टक्केवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2017 7:47 AM

आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू सैराट सिनेमामुळे रातोरात स्टार बनली. तिची एक झलक पाहण्यासाठी रसिक काहीही करायला तयार असतात.मुळात ही ...

आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू सैराट सिनेमामुळे रातोरात स्टार बनली. तिची एक झलक पाहण्यासाठी रसिक काहीही करायला तयार असतात.मुळात ही रिंकू ही दहावीची विद्यार्थीनी आहे. यावरच कोणाचा  विश्वास बसत नव्हता. जेव्हा रिंकू दहावीचे पेपर देण्यासाठी तिच्या परीक्षा केंद्रावर जायची त्यावेळी तिला पाहण्यासाठी परीक्षा केंद्रावरही तुफान गर्दी जमल्याच्या अनेक बातम्या कानावर आल्या असतीलच. आर्ची जिथे जाईल तिथे प्रचंड गर्दी जमत होती.  त्यामुळे तिला शाळेत जाणेही अवघड झाले होते.हे सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आर्चीने 17 नंबरचा फॉर्म  भरत  दहावीची परीक्षा दिली होती. आर्ची अभिनयासोबतच आभ्यासतही हुशार होती. नववीत तिला 84 टक्के गुण मिळाले. विशेष म्हणजे रिंकू आठवीत असताना ‘सैराट’चं शूटींग सुरू झालं होतं.तिने नववीची परीक्षा दिली आणि ‘सैराट’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. शूटींग आणि त्यानंतर चित्रपटाचे प्रमोशन अशी तारेवरची  कसरत करुन, रिंकूने नववीत 84 टक्के गुण मिळवले होते.आज दहावीचा निकाल असल्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांचे निकालावर लक्ष लागले असताना दुसरीकडे चाहते रिंकूच्या निकालाची आतुरतेने वाट पाहात होते अखेर तो क्षण आला आणि रिंकूचा रिझल्ट लागला. खास रिंकूच्या चाहत्यांसाठी आम्ही एक खास गुड न्यूज देणार आहोत. 66.40 टक्के गुण आर्चीने दहावीच्या परीक्षेत मिळवले आहेत.विशेष म्हणजे इंग्रजी विषयात तिला 59 गुण मिळाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा रिंकूसह तिचे चाहतेही सैराट झालं जी म्हणताना दिसतायेत.