बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचालाल सिंग चड्ढा (Laal Singh Chaddha) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी सोशल मीडियावर #BoycottLaalSinghChaddha ट्रेंड होत आहे. अजूनही हा ट्रेंड सुरू असला तर अनेक चाहते या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंग नुकतंच पार पडले. त्याला बऱ्याच सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. त्यानंतर या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चित्रपटांची प्रशंसा करताना दिसत आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरू(Rinku Rajguru)नं सोशल मीडियावर लाल सिंग चड्ढा चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यानचे फोटो शेअर करून पोस्ट लिहिली आहे. यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.
अभिनेत्री रिंकू राजगुरूने 'लाल सिंग चड्ढा'साठी स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर सोशल मीडियावर तिला ट्रोल केले जात आहे. तिच्या अनेक चाहत्यांनी तिला या चित्रपटाचे प्रमोशन न करण्याचा सल्ला दिला आहे. या चित्रपटाचे प्रमोशन तिला महागात पडू शकते असेही युजर्सचं म्हणणे आहे. अभिनेत्रीने आमिर खान नागा चैतन्य या दोघांसह फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, 'लाल सिंग चड्ढाच्या स्क्रिनिंगदरम्यान... नक्की बघावा असा चित्रपट. आमिर खान प्रोडक्शन आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा'.