'सैराट' सिनेमानंतर रिंकू राजगुरु हिने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. रिंकू राजगुरू हंड्रेड या हिंदी वेबसीरिजनंतर आता अॅमेझॉन प्राइमवरील अनपॉज या चित्रपटात दिसणार आहे. पाच हिंदी लघुपट असलेला 'अनपॉज'चा ट्रेलर सादर केला. या लघुपटांमध्ये नवीन शुभारंभाबाबतच्या कथा आहे.
राज अँड डीकेचे दिग्दर्शन असलेला आणि गुलशन दैवय्या व सय्यमी खैरचा अभिनीत ग्लिचमध्ये सध्याच्या काळात लोकांना इतरांच्या संपर्कात येण्याची भिती वाटत असताना एक हायपोकोन्ड्रिक पुरूष अनोळखी भेटीदरम्यान एका विलक्षण उत्साही मुलीला भेटतो. ही भेट त्याने अपेक्षा केलेल्या पेक्षाही अधिक अर्थपूर्ण ठरते.
रिंकू राजगुरू, लिलेट दुबे अभिनीत आणि तनिष्ठा चॅटर्जी यांचे दिग्दर्शन असलेला रॅट-ए-टॅट. दोन महिला, चार दशकांपासून वेगवेगळ्या - एक महिला एकांतात राहण्याचे निवडते, तर दुसरी महिला स्थितींमुळे एकटी राहते, एकांताचा सामना करते आणि लॉकडाऊनदरम्यान त्यांच्यामध्ये असंभव मैत्री होते, ज्यामुळे त्यांना आशा मिळते आणि नवीन शुभारंभाची सुरूवात होते.अविनाश अरूण यांचे दिग्दर्शन असलेला आणि अभिषेक बॅनर्जी व गितिका वैद्य ओहळ्यान अभिनीत विषाणू. लॉकडाऊनदरम्यान एक तरूण स्थलांतरित कुटुंब घरभाडे न भरण्यासाठी त्यांच्या भाड्याच्या घरातून बाहेर काढण्यात आल्यानंतर ते बांधकाम कर्मचारी म्हणून काम करत असलेल्या इमारतीमधील आलिशान सॅम्पल फ्लॅटमध्ये बेकायदेशीर राहण्याचे ठरवतात. यावेळी ते काही काळापुरते त्याच्या गडद वास्तविकतेशी सामना करण्याच्या संघर्षाला बाजूला सारत स्वप्नवत जीवन जगतात.