Join us  

Ved marathi movie : अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ! तिसऱ्या आठवड्यातही ‘वेड’चीच चर्चा, गाठला इतक्या कोटींचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 2:04 PM

Riteish Deshmukh and Genelia Deshmukh Ved Box Office Collection : अर्जुन कपूरच्या ‘कुत्ते’ या सिनेमाकडे आधीच प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. साऊथचा ‘वरिसू’ दमदार कमाई करतोय, ‘अवतार २’ अद्यापही शर्यतीत आहे. पण सर्वाधिक चर्चा आहे ती रितेश आणि जिनिलियाच्या ‘वेड’ या मराठी सिनेमाची.

Riteish Deshmukh and Genelia Deshmukh Ved Box Office Collection :  २०२३चा दुसरा आठवडा संपला आणि आता तिसरा आठवडा सुरू झालाये. नव्या आठवड्यात सिनेप्रेमींना काही नवे सिनेमे रिलीज होण्याची प्रतीक्षा आहे. अलीकडे रिलीज झालेल्या अर्जुन कपूरच्या कुत्ते या सिनेमाकडे आधीच प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. साऊथचा वरिसू दमदार कमाई करतोय, अवतार २ देखील अद्यापही शर्यतीत आहे. पण सर्वाधिक चर्चा आहे ती रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखाच्या  ‘वेड’ या मराठी सिनेमाची. हाेय, ‘वेड’ने बॉक्स ऑफिसवर नुसता धुमाकूळ घातला आहे.  पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं आणि आता तिसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाची घोडदौड सुरूच आहे.

‘वेड’ हा सर्वात जास्त कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. परवा शनिवारपर्यंत या चित्रपटाने एकूण ४४.९२ कोटींचा गल्ला जमवला होता. काल रविवारी ‘वेड’ने मोठी झेप घेतली.  

ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्श यांनी गेल्या तीन दिवसातील ‘वेड’च्या कमाईचे आकडे शेअर केले आहे. या चित्रपटाने शुक्रवारी १.३५ कोटींची, तर शनिवारी २.७२ कोटींची कमाई केली.  रविवारी ‘वेड’च्या कमाईत आणखी वाढ होईल, असा विश्वास जाणकारांनी व्यक्त केला होताच. झालंही तसंच. रविवारी ‘वेड’ने २.७४ कोटींची कमाई केली. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ४७.६६ कोटींचा गल्ला जमवला आहे. लवकरच हा चित्रपट ५० कोटींचा आकडा पार करणार आहे.

‘वेड’ हा सिनेमा रितेश देशमुखने दिग्दर्शित केला आहे. त्याने दिग्दर्शित केलेला हा पहिला सिनेमा. रितेशच्या पहिल्याच प्रयत्नाला मोठ यश मिळालं आहे.  

अनेक विक्रमावर कोरलं नावएकाच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट हा ‘सैराट’च्या नावे असलेला विक्रम ‘वेड’ने मोडीत काढला आहे. रिलीजच्या दुसऱ्या रविवारी 'वेड'ने ५.७० कोटींची कमाई केली होती. व्यावसायिकदृष्ट्या सुपरडुपर हिट ठरलेल्या ‘सैराट’नं कोणत्याही दिवशी एवढी कमाई केली नव्हती. मीडिया रिपोर्टनुसार ‘सैराट’ची सर्वाधिक कमाई ४.६१ कोटींची होती. मात्र ‘सैराट’चा हा रेकॉर्ड 'वेड'ने मोडला आहे. ‘लय भारी’ हा रितेश देशमुखचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट होता. पण ‘वेड’ने त्यालाही मागे टाकलं. याशिवाय ‘वेड’ आणखी एका विक्रमावर नाव कोरलं आहे. चित्रपटाने सर्वात जास्त कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत दुसरं स्थान पटकावलं आहे. पहिलं स्थान अर्थातच ‘सैराट’कडे आहे. 

टॅग्स :वेड चित्रपटरितेश देशमुखजेनेलिया डिसूजामराठी चित्रपट