Join us

Ved Marathi Movie : हिट है बॉस ! रितेश जिनिलियाच्या सुपरक्युट जोडीने पुणेकरांनाही लावले 'वेड', दोघांचा साधेपणा बघून पुणेकर भारावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 08:53 IST

महाराष्ट्राची सुपरक्युट जोडी रितेश जिनिलियाचे 'वेड' काही कमी होत नाही.

Ved Marathi Movie :  महाराष्ट्राची सुपरक्युट जोडी रितेश जिनिलियाचे 'वेड' काही कमी होत नाही. बॉक्सऑफिसवर अफलातून कामगिरी करणाऱ्या त्यांच्या 'वेड' सिनेमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या दोघांनी मिळून महाराष्ट्रभर केलेले प्रमोशनही जोरदारच होते त्यामुळे सिनेमा आणखी हिट झाला. मुंबई व्यतिरिक्त कोल्हापूर, तुळजारपूर, लातूर, पुणे अशी अनेक शहरांमध्ये त्यांनी लोकांमध्ये मिसळून 'वेड' चे प्रमोशन केले. आता नुकतेच त्यांनी पुन्हा एकदा पुणेकरांना वेड लावलं आहे. 

पुण्याच्या सिनेमा हॉलमध्ये सरप्राईझ भेट

रितेश आणि जिनिलियाने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. नुकतेच त्यांनी पुण्याच्या एका थिएटरमध्ये वेड सिनेमा संपल्यानंतर सरप्राईझ भेट देत चाहत्यांना सुखद धक्काच दिला. सलमान खानसोबतटचे रितेशचे वेड लागलंय हे गाणे चालू असताना रितेश आणि जिनिलियाने एंट्री घेतली आणि पुणेकर अक्षरश:ओरडलेच. दोघांनी प्रेक्षकांसमोर वेड लागलंय वर डान्सही केला. इतकंच नाही तर सर्वांना आदराने भेटून सेल्फी काढला, गप्पा मारल्या. या क्युट जोडीचा साधेपणा बघून पुणेकरही भारावले.

'वेड' ची बॉक्सऑफिसवरील कमाई

पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे.  चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 2 कोटी 25 लाख रुपये कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी 3.25 कोटी कमावले. तिसऱ्या दिवशी 4.50 कोटी, चौथ्या दिवशी 3.02 कोटी, पाचव्या दिवशी 2.65 कोटी, सहाव्या दिवशी 2.55 कोटी, सातव्या दिवशी 2.45 कोटींची कमाई केली. आठव्या दिवशी 2.52 कोटींचा गल्ला जमवला. नवव्या दिवशी या सिनेमाने पहिल्या दिवशीपेक्षा दुप्पट म्हणजे सुमारे 5 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

रितेश-जिनिलियासह‘वेड’ या सिनेमात अशोक सराफ, विद्याधर जोशी, शुभंकर तावडे आणि जिया शंकर हे कलाकारदेखील मुख्य भूमिकेत आहेत. तसेच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची  झलकदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. वेड या सिनेमातून रितेशने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे तर जिनिलियाचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.

टॅग्स :वेड चित्रपटरितेश देशमुखजेनेलिया डिसूजामराठी चित्रपटमराठी अभिनेता