Join us

Riteish Deshmukh : वैयक्तिक आयुष्याबाबत रितेश देशमुखचा मोठा खुलासा, म्हणाला - आम्ही दोघंही सिगारेट व दारू…

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 19:36 IST

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुझा-देशमुख(Genelia Dsouza-Deshmukh)चा वेड मराठी चित्रपट महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावत आहे.

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुझा-देशमुख(Genelia Dsouza-Deshmukh)चा वेड मराठी चित्रपट महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावत आहे. वेड चित्रपट जरी रिमेक असला तरी रितेशचे दिग्दर्शन आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.

 सत्या आणि श्रावणीचा प्रेरणादायी प्रवास उलगडणारा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २ कोटी ३० लाखांचा गल्ला जमवला. शनिवारी ३.२५ कोटी, रविवारी मात्र हा आकडा अधिक वाढत जाऊन ४.५० कोटींचा पल्ला गाठलेला पाहायला मिळाला. अवघ्या चार दिवसात चित्रपटाने जवळपास १३ कोटींचा टप्पा पार केलेला दिसून येत आहे. वेड चित्रपटाच्या यशाची घोडदौड ह्या आठवड्यात देखील अशीच चालू राहणार आहे. 

मात्र चित्रपटातील एका सीनमुळे रितेशला त्याच्या मुलांनी एक प्रश्न विचारला होता. हा प्रश्न म्हणजेच तुमच्या तोंडात ते काय आहे? रितेशने वेड चित्रपटासाठी तोंडात सिगरेट घेतलेली पाहून मुलांनी हे जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारला.

रितेशने त्यांना सरळ जे आहे तेच खरे उत्तर दिले. प्रश्नावर उत्तर देताना रितेश म्हणाला की, माझ्या मुलांनी माझ्या तोंडात काय आहे ते विचारलं. ते म्हणाले की आम्ही इतर लोकांच्या तोंडात सुद्धा हे पाहिलं आहे. मी त्यांना सांगितलं की सिगरेट ही आरोग्यासाठी धोकादायक आहे. मी ही गोष्ट कधी करत नाही. आम्ही दोघे पण सिगरेट आणि दारू पित नाहीत, हे मी त्यांना स्पष्ट सांगितलं. 

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजावेड चित्रपट