Join us

प्रतिक्षा संपली,या तारखेला रितेश देशमुखचा 'माऊली' सिनेमा येणार रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 1:00 PM

आषाढी एकादशीचा मुहुर्त साधत सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत खुद्द रितेशने याबाबतची माहिती दिली आहे.

अभिनेता रितेश देशमुखचा पहिलावहिला मराठी सिनेमा 'लय भारी' सिनेमातील या डायलॉगने मराठी मनावर आणि तरुणाईवर जादू केली होती.रुपेरी पडद्यावरील रितेशचा अभिनय रसिकांना चांगलाच भावला होता.त्यामुळेच की काय या सिनेमाने तिकीट खिडकीवर कमाईचे नवनवे रेकॉर्ड्सही रचले होते.लय भारी सिनेमातील रितेशने साकारलेला 'माऊली' रसिकांच्या काळजात घर करुन गेला होता.लय भारी या सिनेमाच्या यशामुळे रितेशच्या दुस-या मराठी सिनेमाची रसिकांना उत्सुकता लागली होती.हिंदीत विविध सिनेमात झळकणारा रितेश मराठीत पुन्हा एकदा कधी दिसणार असा प्रश्न रसिकांना पडला होता.आता रसिकांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.कारण रितेशचा दुसरा मराठी सिनेमा 'माऊली' हा 21 डिसेंबर 2018 ला रसिकांच्या भेटीला येणार आहे. आषाढी एकादशीचा मुहुर्त साधत सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत खुद्द रितेशने याबाबतची माहिती दिली आहे.

 

'लय भारी' सिनेमाने रसिकांच्या पसंती मिळवत नवा रेकॉर्ड रचला होता.त्यामुळे रसिकांच्या अपेक्षांना तडा जाऊ न देण्याची मोठी जबाबदारी असते.या सगळ्या गोष्टींचा विचार करुन काही तरी वेगळे घेऊन माऊली सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत असल्याचे रितेशने स्पष्ट केले आहे.'माऊली' या सिनेमात रितेश भूमिका साकारत असून त्याच्यासह सय्यामी खेर त्याच्या नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार करणार आहे.या सिनेमाची कथा क्षितीज पटवर्धन याने लिहिली असून रितेशची निर्मिती संस्था या सिनेमाची निर्मिती करणार आहे.सय्यामी माऊलीद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असली तरीहीतिची बहीण संस्कृती मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काही वर्षांपासून काम करत आहे.संस्कृती खेरने हिंदी नाटकातून आपल्या करियरला सुरुवात केली. त्यानंतर तिने स्वामी पब्लिक लिमिटेड या मराठी सिनेमातही काम केले होते. 

2009 साली सुजॉयने रितेश देशमुखच्या अलाद्दीन या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवू शकला नाही.मात्र यानंतरही सुजॉयनं हार मानली नाही.त्यामुळेच 'कहानी','कहानी-2','टीई3एन' या सुजॉयनं दिग्दर्शित केलेल्या सिनेमांना बॉक्स ऑफिसवर रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.दुसरीकडे रितेश देशमुख अभिनयासह निर्मात्याची भूमिकाही यशस्वीरित्या सांभाळत आहे.'बालक पालक','लय भारी,'फास्टर फेणे' अशा सिनेमांच्या माध्यमातून मराठी सिनेमाला नव्या उंचीवर नेऊन ठेवण्यात रितेश मोलाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे सुजॉय आणि रितेश मराठी सिनेमाच्या निमित्ताने एकत्र येत नवा चमत्कार करणार का याकडं आता रसिकांच्या नजरा लागल्या आहेत. 

टॅग्स :रितेश देशमुख