Join us

'वेड'मध्ये जिनिलियाला घेण्यामागचं रितेश देशमुखनं सांगितलं कारण, म्हणाला - 'महाराष्ट्राची सून...'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2023 7:00 AM

Riteish Deshmukh-Genelia Deshmukh's Ved Movie: रितेश देशमुख दिग्दर्शित वेड चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर सुमारे ५ कोटींचा गल्ला जमवला आहे.

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिग्दर्शित वेड (Ved Marathi Movie) चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर सुमारे ५ कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून थिएटर मालकांनी बाकीच्या चित्रपटांचे स्क्रीन हटवून वेड चित्रपटाचे शो लावले. चित्रपट समीक्षक आणि काही जाणकारांनी चित्रपट १०० कोटींचा पल्ला गाठणार असा विश्वास व्यक्त केला आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल रितेशने आभार मानले आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून रितेशने दिग्दर्शन तर जिनिलिया डिसूझा-देशमुख(Genelia D'souza-Deshmukh)ने मराठी नायिका म्हणून पदार्पण केले आहे. एकीकडे या दोघांच्याही कामाचं कौतुक होत असताना मात्र दुसरीकडे तिला धड मराठी सुद्धा बोलता येत नाही अशी टीका सुद्धा करण्यात आली. दरम्यान आता रितेशने जिनिलियाला ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले आहे.

जिनिलियाच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीला संधी का नाही दिली, असा प्रश्न केला जात आहे. जेनेलियाचा अभिनय अप्रतिम आहे, मात्र मराठी भाषेवर तिचे फारसे प्रभुत्व नाही अशी टीका होताना दिसते आहे. त्यामुळे जिनिलियाला ही भूमिका का दिली? हा प्रश्न त्याला विचारण्यात आला. तेव्हा रितेश म्हणाला की, जिनिलियाने आतापर्यंत वेगवेगळ्या भाषेतून काम केलं आहे. महाराष्ट्राची सून म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. त्यांची खूप अगोदरपासूनच एक इच्छा होती की मुख्य भूमिका असलेला एक तरी मराठी चित्रपट आपण करायचा. आणि म्हणूनच त्यांनी वेड चित्रपटात श्रावणीची भूमिका साकारली. 

तो पुढे म्हणाला की, प्रॉपर डबिंग आर्टिस्ट कडून डायलॉग रेकॉर्ड करणे सहज शक्यही होतं, मात्र त्यांनी तसं केलं नाही. श्रावणीचं पात्र लोकांना आपलंसं वाटलं पाहिजे म्हणून त्यांनी स्वतःच या भूमिकेला आवाज दिला. मी म्हणतो की त्या या परीक्षेत पास सुद्धा झाल्या. चित्रपटात त्या उत्तम मराठी बोलल्या आहेत आणि त्यांचा अभिनय सुद्धा एवढा छान झाला आहे की तो पुन्हा पुन्हा पहावासा वाटेल. ​
टॅग्स :वेड चित्रपटरितेश देशमुखजेनेलिया डिसूजा