Join us  

'वेड' लावणाऱ्या रितेश देशमुखनं चाहत्यांना लग्नाबाबत दिला अजब सल्ला, म्हणाला - 'लग्न...'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 2:49 PM

Riteish Deshmukh :'वेड'मुळे चर्चेत असणारा रितेश देशमुख आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात त्याने लग्नाबाबत अजब सल्ला दिला आहे.

अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया डिसूझा-देशमुखचा वेड (Ved Marathi Movie) चित्रपट ३० डिसेंबरला रिलीज झाला. हा चित्रपट रिलीज होऊन महिना उलटला तरीही अद्याप या चित्रपटाचे चाहत्यांमधले क्रेझ अद्याप संपलेले नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आहे. वेड चित्रपटाने ७० कोटींचा आकडा पार केला आहे. वेडमुळे चर्चेत असणारा रितेश देशमुख आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात त्याने लग्नाबाबत अजब सल्ला दिला आहे. 

रितेश देशमुख या व्हिडीओत बोलताना दिसतो आहे की, लग्न केलेच पाहिजे. म्हणजे त्याला कळेल की लग्न का केले नाही पाहिजे. रितेशच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख सोशल मीडियावर सक्रीय आहेत आणि या माध्यमातून चाहत्यांना ते अपडेट देत असतात. बऱ्याचदा ते कॉमेडी व्हिडीओदेखील शेअर करतात. त्यांच्या व्हिडीओंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते. 

'वेड'ची ८० कोटींकडे वाटचाल'वेड' हा चित्रपट ३० डिसेंबरला प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने २ कोटी २५ लाखांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर प्रदर्शना नंतरच्या पहिल्या आठवड्यात २० कोटींचा पल्ला गाठला. दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने ४० कोटी तर तिसऱ्या आठवड्यात ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. आता 'वेड' ८० कोटींकडे वाटचाल करत आहे. मराठीमध्ये सर्वाधिक कमाई करणारा 'वेड' हा दुसरा सिनेमा ठरला आहे. पहिल्या क्रमांकावर अर्थात अजूनही नागराज मंजुळेंंचा 'सैराट' आहे.

टॅग्स :रितेश देशमुखवेड चित्रपट