रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. ‘वेड’ चित्रपटातून रितेश आणि जिनिलीया प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या चित्रपटातून महाराष्ट्राच्या लाडक्या जोडीने प्रेक्षकांना भुरळ घातली. वेडमधून रितेशने दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. तर जिनिलीयाने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. रितेशच्या या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या रितेश देशमुखच्यावेड चित्रपटामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाचं येत्या २० ऑगस्टला वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर होणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. या निमित्ताने सत्या-श्रावणीचं प्रेमाचं प्रतीक असलेल्या लाल रंगाच्या १ हजार १४६ छत्र्या वापरुन मोठं हार्ट तयार करण्यात आलं होतं. याची ‘लार्जेस्ट अम्ब्रेला इमेज’ या कॅटेगरीमध्ये नोंद करण्यात आली आहे. ‘वेड’ चित्रपटाच्या निमित्ताने मराठी वाहिनी आणि मराठी चित्रपटसृष्टीची पहिल्यांदाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
OMG 2 Review : दमदार कथा, अंगावर काटा आणणारे संवाद, अन्...; अक्षयचा OMG 2 कसा आहे?
‘वेड’च्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डवर अभिनेता रितेश देशमुखने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. वेड चित्रपटाचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव होतंय, यासाठी स्टार प्रवाहाचा मी आभारी आहे. त्यांच्या मेहनतीमुळे हे शक्य झालं. हिंदी चित्रपटसृष्टीत मी जवळपास २० वर्षांपासून काम करत आहे. पण, तिकडे असं कधीच झालं नाही जे मराठी चित्रपटसृष्टीत होतंय.”