Join us

सिद्धार्थ जाधवच्या वाढदिवशी रितेश भाऊची खास पोस्ट, सिनेमाच्या सेटवरील फोटो शेअर करत म्हणाला- "माझा फेव्हरेट..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 16:06 IST

मराठी सिनेसृष्टीतील रणवीर सिंग अशी ओळख बनवलेल्या सिद्धार्थ जाधवचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवशी अभिनेता रितेश देशमुखने खास पोस्ट शेअर केली आहे. 

मराठी सिनेसृष्टीतील रणवीर सिंग अशी ओळख बनवलेल्या सिद्धार्थ जाधवचा आज वाढदिवस आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या सिद्धार्थने अभिनय आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर सिनेसृष्टीत त्याचं स्थान निर्माण केलं. 'अगं बाई अरेच्चा' या केदार शिंदेंच्या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलेल्या सिद्धार्थने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. आज त्याच्या वाढदिवशी अभिनेता रितेश देशमुखने खास पोस्ट शेअर केली आहे. 

रितेशने सिद्धार्थच्या वाढदिवशी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट शेअर केली आहे. माऊली सिनेमाच्या शूटिंग सेटवरील सिद्धार्थबरोबरचे काही फोटो रितेशने शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत रितेशने सिद्धार्थला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. "हॅपी बर्थडे माय फेव्हरेट सिद्धार्थ...आय लव्ह यू" असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. रितेश आणि सिद्धार्थने माऊली सिनेमात एकत्र काम केलं होतं. 

'जत्रा', 'साडे माडे तीन', 'ये रे येरे पैसा',  'माझा नवरा तुझी बायको', 'दे धक्का', 'फक्त लढ म्हणा' अशा सुपरहिट सिनेमांमध्ये सिद्धार्थने काम केलं आहे. 'खो खो', 'हुप्पा हुय्या', 'धुरळा' या सिनेमांमध्ये सिद्धार्थच्या अभिनयाची वेगळी बाजू पाहायला मिळाली. सिद्धार्थने मराठीबरोबरच बॉलिवूडही गाजवलं आहे. रोहित शेट्टीच्या 'सिंबा', 'सूर्यवंशी', 'सर्कस' या सिनेमांमध्ये तो झळकला आहे. 

टॅग्स :रितेश देशमुखसिद्धार्थ जाधवमराठी अभिनेता