Join us  

Ved Marathi Movie : रितेश-जिनिलियाचा 'वेड' बॉक्स ऑफिसवर सुसाट..!, 'सैराट'पाठोपाठ मोडला 'या' सिनेमाचा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 5:45 PM

Ved Marathi Movie : वे़ड चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ३५.७७ कोटींची कमाई केली आहे.

रितेश देशमुख  (Riteish Deshmukh)आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांच्या वेड (Ved Marathi Movie) या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. हा चित्रपट ३० डिसेंबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच हा चित्रपट चर्चेत आला होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. नुकताच या चित्रपटाने एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट सैराटच्या नावावर असलेला विक्रम मोडीत काढला आहे. एकाच दिवशी ५.७० कोटींची कमाई केली आहे. त्यापाठोपाठ आता या चित्रपटाने आणखी एक विक्रम नोंदवला आहे.

वेड चित्रपटातूनरितेश देशमुखने दिग्दर्शनात पदार्पण केले. तर जिनिलीया देशमुखने मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. अशा परिस्थितीतही रितेश आणि जिनिलिया प्रेक्षकांचे मनं जिंकण्यात कुठेही कमी पडलेले नाहीत. वे़ड चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ३५.७७ कोटींची कमाई केली आहे.

वेड या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. वेड या चित्रपटाने आणखी एक विक्रम नोंदवला आहे. सोमवारपर्यंत या चित्रपटाने कमावलेल्या एकूण रकमेचा आकडा ३५.७० कोटी होता. फक्त ११ दिवसांत ३५.७० कोटी कमावणारा रितेशचा हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. हा विक्रम आधी लय भारीच्या नावे होता. आता ती जागा वेडने घेतली आहे. वेड हा रितेश देशमुखचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, वेड चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या वीकेंडला शुक्रवारी २.५२ कोटी, शनिवारी ४.५३ कोटी आणि रविवारी ५.७० कोटींचा गल्ला जमवला आहे. तर सोमवारी या चित्रपटाने २.३५ कोटींची कमाई केली.  वेड चित्रपटाच्या टीझरला, सगळ्या गाण्यांना आणि ट्रेलरला प्रेक्षकांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला होता. या चित्रपटात रितेश-जिनिलियाबरोबरच अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. अभिनेता सलमान खानदेखील या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला.

टॅग्स :वेड चित्रपटरितेश देशमुखजेनेलिया डिसूजा