सिंहगडावर होणार या चित्रपटाची गर्जना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2017 5:37 PM
बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाचा ट्रेलर लोकार्पण सोहळा पुण्यातील सिंगहडावर होणार आहे. गुरुवारी ५ जानेवारी रोजी दुपारी ३ ...
बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाचा ट्रेलर लोकार्पण सोहळा पुण्यातील सिंगहडावर होणार आहे. गुरुवारी ५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता सर्व कलाकारांच्या उपस्थित या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात येणार आहे. या सिनेमातील काही गाण्याची झलक आणि पोस्टर पाहता ट्रेलरमध्ये देखील काहीरी धमाकेदार असणार याची खात्री येते. शिवाजी महाराजांच्या गड किल्यांचे संवर्धन आणि जतन करावे असे देखील यातून सांगण्यात आले आहे. महाराजांची शौर्यगाथा रुपेरी पडदयावर उलगड असतानाच आजच्या पिढीने पेटून उठावा असा संदेश देखील या सिनेमात असणार आहे. सिंहगडावर ट्रेलर लाँच करण्यात येणारा हा पहिलाच चित्रपट आहे. या सिनेमाचे बरेचसे चित्रपट गड-किल्यांवर देखील करण्यात आल्याचे समजतेय. त्यामुळे महाराजांचे वैभव पुन्हा एकदा आपल्याला या चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या पडदयावर अनुभवता येणार आहे. बघतोय काय मुजरा करह्ण या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे. या सिनेमात शिवाजी महाराजांना एका वेगळ्याच पद्धतीने मुजरा करण्यात आला आहे. एवढेच नाही तर गड किल्यांच्या संवर्धनासाठीदेखील यातील कलाकार पुढाकार घेताना दिसत आहेत. हेमंत ढोमेने दिग्दर्शित केलेला हा पहिलाच सिनेमा असल्याने यासाठी हेमंत फारच उत्सुक आहे. हेमंत ढोमेच्या बघतोस काय मुजरा कर या आगामी सिनेमामध्येही काहीसा हाच आशय घेण्यात आला आहे. या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन हेमंतनेच केलं असून या सिनेमात जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव यांची मुख्य भूमिका आहे. या सिनेमाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून उत्तम सिनेमॅटोग्राफीचे दर्शन या काही मिनिटांच्या टिझरमध्ये होते. यात महाराष्ट्रातले गड किल्ले यांची सध्या झालेली दुरावस्था तर दुसरीकडे इंग्रजांनी जतन केलेल्या त्यांच्या ऐतिहासिक वास्तू यांच्यामधला फरक दाखवला आहे.सिनेमाचे काही शूट लंडनमध्येही झाले आहे. त्यामुळे जर संहिता चांगली असेल तर आता मराठी सिनेमाही सातासमुद्रापार जाण्यासाठी धजावत नाही हेच दिसून येतंय. प्रथमदर्शनी टिझर, गाणे आणि पोस्टर्स पाहिल्यानंतर या सिनेमाबद्दलची चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे यात काही शंका नाही. पुढच्या वर्षी ३ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.