Join us

Exclusive संतोष जुवेकर साकारणार छोटा राजनची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2016 2:47 PM

अंडडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या आयुष्यावरील 'राजन' हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे.अभिनेता संतोष जुवेकर या सिनेमात छोटा राजनची ...

अंडडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या आयुष्यावरील 'राजन' हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे.अभिनेता संतोष जुवेकर या सिनेमात छोटा राजनची मध्यवर्ती भूमिका साकारणार असून दाऊदच्या भूमिकेसाठी जॅकी श्रॅाफशी बोलणी सुरू असल्याचे कळते आहे. विशेष म्हणजे  गेल्या काही दिवसांपासून सनी लिओनीही मराठी सिनेमात झळकणार असल्याच्या फक्त चर्चा रंगत होत्या. मात्र आता 'राजन'सिनेमात सनी लिओनी आयटम साँग करताना दिसणार असल्याचेही दिगदर्शक भरत सुनंदा यांनी सांगितले आहे. समाजात वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. मात्र आपल्या उराशी बाळगलेले ध्येय पूर्ण करण्याची जिद्द कधी कधी त्याला चुकीच्या मार्गावर घेऊन जाते आणि त्याच्या आयुष्यातील हेच बदल राजन या सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्याचा दिग्दर्शकाने प्रयत्न केला असून अंडरवर्ल्डवर आधारित सिनेमांमध्ये मराठीत कधीही न पाहिलेला थरार रसिकांना राजन या सिनेमांमधून अनुभवता येणार आहे.