सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar), अशोक सराफ (Ashok Saraf) आणि निवेदीता सराफ ( Nivedita Saraf) यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यांच्यामध्ये चांगले ट्युनिंग देखील आहे. त्यांची ही केमिस्ट्री सिनेमात आपल्याला अनुभवायला मिळते. पण तुम्हाला माहित्येय का, सचिन पिळगावकर अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या लग्नात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी निवेदीता यांच्या भावाची भूमिका बजावत अशोक सराफ यांचा कान पिळला होता. दरम्यान आता सचिन पिळगावकरांनी सोशल मीडियावर अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या लग्नातला फोटो शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
सचिन पिळगावकर यांनी अशोक-निवेदीता सराफ यांच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिले की, अशोक-निवेदिता यांचा लग्नसोहळा. नुकतेच अशोक-निवेदीता सराफ यांच्या लग्नाला ३५ वर्षे पूर्ण झाली.
'मामला पोरीचा' या चित्रपटाच्या सेटवर दोघांची मैत्री फुलली. पुढे 'नवरी मिळे नवऱ्याला' या सिनेमाच्या सेटवर मैत्रीसोबतच प्रेमही फुललं अन् दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे गोव्यातील मंगेशीच्या मंदिरात लग्नगाठ बांधली. अशोक सराफ आणि व निवेदिता सराफ यांच्या वयात १८ वर्षांचं अंतर असल्याने निवेदिता सराफ यांच्या घरातून या नात्याला विरोध होता. तसंच सिनसृष्टीतील व्यक्तीबरोबर निवेदिता यांनी लग्न करू नये, अशीही त्यांची इच्छा होती.
अशोक सराफ-निवेदीता सराफ यांचं साधेपणानं पार पडलं लग्न
निवेदिता जोशी यांची मोठी बहीण डॉ. मीनल परांजपे यांनी अशोक सराफ यांच्याशी निवेदिताचं लग्न व्हावं यासाठी पुढाकार घेतला आणि कुटुंबीयांचे मन वळविण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्यानंतर गोव्यातील मंगेशीच्या देवळात जे सराफ यांचे कुलदैवत आहे तिथे अशोक आणि निवेदिता सराफ या दोघांचं लग्न झालं. दोघांनी एकमेकांना साथ देण्याचे मंगेशीच्या साक्षीने ठरवले. दोघांचेही अत्यंत साधेपणाने लग्न पार पडले. यावेळी भावाची भूमिका सचिन पिळगावकरांनी पार पाडली. तसेच वधूचा भाऊ म्हणून अशोक सराफ यांचा कानही पिळला होता.