Join us

सचिन पिळगांवकर दिसणार शिक्षण मंत्र्याच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 7:37 AM

आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूकीत बरेच नवे दावपेच खेळले जाण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. या निवडणूकांत काहीही करून ...

आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूकीत बरेच नवे दावपेच खेळले जाण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. या निवडणूकांत काहीही करून मतं आपल्या खात्यात करण्यासाठी पक्षांमध्ये चुरस रंगली आहे.अशातच प्रसिध्दीच्या शिखरावर असणारे कैक चेहरे येऊ घातलेल्या निवडणुकीचा भाग होण्याचं चित्र नाकारता येत नाही.त्यातच सचिन पिळगांवकरांचा राजकारणी लूक बाहेर आला आणि या ‘अभि’नेत्यांच्या यादीत अजून एक नाव जोडलं जातंय की काय.अशी पाल कित्येकांच्या मनात चुकचुकली.मात्र असं काहीही नसून आगामी ‘रणांगण’ चित्रपटात सचिन पिळगांवकर राजकारण्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.शिक्षण आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे आणि त्यात शिक्षणमंत्र्याची भूमिका साकारणं ही एक जबाबदारीच हीच जबाबदार व्यक्तिरेखा सचिन पिळगांवकर साकारत आहेत.रणांगण या चित्रपटाच्यानिमित्ताने विविध शिक्षणसंस्थांमधील राजकारणाची हलकी झलक प्रेक्षकांसमोर येणार आहे.गेली कित्येक वर्ष हिंदी-मराठी सिनेसृष्टीत बालकलाकार ते दिग्दर्शक अशी सगळीच शिखरं सर करणारे सचिन पिळगांवकर आता राजकारणाच्या रणांगणातले डावपेच तितक्याच ताकदीने खेळणार आहेत.नुकताच लाँच झालेल्या लूक पोस्टरमध्ये दिसणारा सचिन पिळगांवकरांचा रोष सचिन पिळगांवकरांची एक वेगळीच बाजू प्रेक्षकांसमोर आणणार असल्याची ग्वाही देतो.शैक्षणिक रणांगणात पेटलेलं हे राजकारण लवकरच प्रदर्शित होणाऱ्या रणांगण या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.या रणांगणात सचिन पिळगांवकरांसमोर स्वप्नील जोशी असणार आहे. त्याच बरोबर सुचित्रा बांदेकर,सिध्दार्थ चांदेकर, आनंद इंगळे,प्रणाली घोगरे आणि इतर कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 52 विक्स एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेनमेंट मिडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स्) आणि हार्वे फिल्म्स निर्मित रणांगण चित्रपटाची निर्मिती करिष्मा जैन आणि जो राजन यांनी केली आहे.तर अर्जुन सिंहबर्रन, स्वप्नील जोशी आणि कार्तिक निशानदार यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे.सचिन पिळगांवकरांमधला राजकारणी आपल्यासमोर आणण्याचं श्रेय जातं या चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश सारंग यांना.या चित्रपटाच्या निमित्ताने नुकताच लाँच झालेला सचिन पिळगांवकरांच्या राजकारणी लूकने प्रेक्षक आश्चर्य चकित झाले असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.तसेच गेली कित्येक वर्ष तरूणींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी आता खलनायकी भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे.