Join us  

​सई ताम्हणकरने स्वीकारला तिचा पहिला फिल्मफेअर अवार्ड फॅमिली कट्टासाठी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 9:44 AM

नेसको आयटी पार्क येथे २७ ऑक्टोबर २०१७ रोजी जिओ फिल्मफेअर अवॉर्ड्स २०१७ हा सोहळा अगदी दिमाखात पार पडला. विविध ...

नेसको आयटी पार्क येथे २७ ऑक्टोबर २०१७ रोजी जिओ फिल्मफेअर अवॉर्ड्स २०१७ हा सोहळा अगदी दिमाखात पार पडला. विविध प्रकारचे परफॉर्मन्स हा सोहळ्याचा प्लस पॉईंट असला तरी रेडकार्पेट ही जोरदार होते. सई ताम्हणकरचा ब्लु गाऊन विथ डायमंड नेकलेस विशेष लक्षवेधी ठरला! या व्यतिरिक्त सईसाठी फिल्मफेअरच हे तिसरं वर्ष विशेष ठरले आहे. या वेळेसचा फिल्मफेअर अवॉर्ड्स सई ताम्हणकरसाठी नक्कीच विशेष होता. कारण फिल्मफेअर २०१७ मध्ये सईला दोन चित्रपटांसाठी नामांकने होती. वजनदार चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचे तर फॅमिली कट्टा या चित्रपटासाठी त्याला उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते.   सई ताम्हणकरसाठी हा पुरस्कार सोहळा खूपच विशेष ठरला. कारण फॅमिली कट्टासाठी उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा तिला पुरस्कार मिळाला. सईच्या चित्रपट वाटचालीमधला हा पहिला फिल्मफेअर अवॉर्ड आहे. फिल्मफेअरचे हे तिसरे वर्ष आहे आणि  त्यामुळे तिच्यासाठी हा पुरस्कार विशेष होता. हा अवॉर्ड स्वीकारताना सई खूप भारावून गेली होती. या बाबत सई सांगते, हा  माझा पहिला फिल्मफेअर आहे आणि मला याचा खरंच खूप आनंद होत आहे. हा फिल्मफेअर आणखी खास आहे कारण मला हा अवॉर्ड फॅमिली कट्टासाठी मिळाला आहे. हा चित्रपट माझ्यासाठी अनेक पर्सनल कारणांसाठी खास होता, खूप जवळचा होता आणि त्या चित्रपटासाठी पुरस्कार मिळणे आणि ते ही पहिला फिल्मफेअर मिळणं हे तर नक्कीच फार आनंददायी आहे. पण  मी या सेलिब्रेशनमध्ये जास्त काळ रमणार नाहीये, पुढच्या कामासाठी लगेच तयार होणार आहे. इनफॅक्ट माझे डेली रुटीन सुरू झालंय.'२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या फॅमिली कट्टा या चित्रपटात सईने 'मंजू' नावाची भूमिका साकारली होती. चित्रपटातला तिचा वावर अवघा काही मिनिटांचा असला तरी तिच्या उत्कृष्ट अभिनयाने ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच स्मरणात राहिली. या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर प्रभाव पाडला होता आणि याच तिच्या भूमिकेसाठी तिला उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.  Also Read : फिल्मफेअर पुरस्कारातही सैराटने मारली बाजी... जाणून घ्या कोण ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता