Join us

सई ताम्हणकर बनली प्रिया बापटची हेअर स्टायलिस्ट, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 13:18 IST

Sai Tamhankar And Priya Bapat : अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेत्री प्रिया बापट मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्या दोघांची मैत्री खास आहे. त्या दोघी बऱ्याचदा एकमेकींसाठी सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेत्री प्रिया बापट मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्या दोघांची मैत्री खास आहे. त्या दोघी बऱ्याचदा एकमेकींसाठी सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. प्रिया आणि सईचे अनेक फोटो व्हायरल होताना दिसतात आहेत. हे फोटो शेअर करताना प्रिया आणि सई एकमेकींचं कौतुक करताना थकत नाही. दरम्यान आता प्रियाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात सई तिची हेअरस्टाईल करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.

प्रिया बापटने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सई प्रियाचे केसांची आयनिंग करताना दिसत आहे. या व्हिडीओवर प्रियाने लिहिले की, माझी सुपरस्टार हेअरस्टायलिस्ट. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये प्रियाने म्हटले की, हे आहे प्रेम. त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.  

सई ताम्हणकर आणि प्रिया बापट दोघीही मराठीतील आघाडीच्या अभिनेत्री आहेत. त्या दोघांनी 'वजनदार' आणि 'टाइम प्लीज' या सिनेमात एकत्र काम केले आहे. या दोन्ही सिनेमात सई-प्रियाचा अभिनय आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे. सई आणि प्रियाने मराठीसोबतच हिंदी कलाविश्वात अभिनयाची चुणूक दाखवली आहे. त्यांच्या सिनेमा- वेबसीरिजसाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.  

टॅग्स :प्रिया बापटसई ताम्हणकर