Join us

'तू माझ्या आयुष्यात आहेस'; रोमॅण्टिक होत सईने दिल्या अनिशला वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2023 1:57 PM

Sai tamhankar: सईच्या या पोस्टवर अनिशने केलेली कमेंटही नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

मराठी कलाविश्वातील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर (sai tamhankar). आपल्या दमदार अभिनयामुळे चर्चेत येणारी सई गेल्या काही काळापासून तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत आहे.  सई प्रसिद्ध निर्माता अनिश जोग (anish joag) याला डेट करत असून अलिकडेच ही जोडी स्पेनमध्ये त्यांचा क्वालिटी टाइम एन्जॉय करायला गेले होते. त्या दोघांचे स्पेनवारीतील अनेक फोटोही सोशल मीडियावर चर्चेत राहिले. त्यानंतर आता सईने अनिशसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सईने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने अनिशला वाढदिवसाच्या रोमॅण्टिक शुभेच्छा दिल्या आहेत. यात तिने त्याच्यासोबत एक फोटो आणि एक बुमरँगचा व्हिडीओ टाकला आहे. ''वाढदिवसाच्या शुभेच्छा My Gem. भरभरुन जग आणि खूश रहा. तुझ्यासारखी माणसं होणं आता बंद झालं आहे. तू माझ्या आयुष्यात आहेस यामुळे मी खूप जास्त आनंदी आहे. #birthdayboy #appleofmyeye ", असं कॅप्शन देत सईने अनिशसाठी पोस्ट लिहिली आहे.

दरम्यान, सईची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनिशनेही त्यावर कमेंट करत तिचे आभार मानले आहेत. 'थँक्स माय लव्ह, यामुळे माझा दिवस खूप छान झाला', असा रिप्लाय अनिशने दिला आहे.  काही महिन्यांपूर्वी दौलतराव असं म्हणत सईने अनिशविषयी असलेलं प्रेम जाहीररित्या सांगितलं होतं. त्यानंतर अनिशनेही सईसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिच्या पोस्टला दुजोरा दिला होता.

टॅग्स :सई ताम्हणकरसेलिब्रिटीसिनेमा