Join us

सई ताम्हणकर नव्या फोटोशूटमुळे झाली ट्रोल, नेटकऱ्यांनी केली पालीशी तुलना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 11:27 IST

Sai Tamhankar : सई ताम्हणकर नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर(Sai Tamhankar)ने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. बॉलिवूडमध्येही तिने आपले स्थान निर्माण केले आहे. सईला मिमी या चित्रपटासाठी आयफा, फिल्मफेअर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिनयाच्या बरोबरीने ती फोटोशूटमुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने एक फोटोशूट केले आहे ज्यामुळे तिला ट्रोल करण्यात आले आहे.

सई ताम्हणकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच ती बऱ्याचदा सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करते. नुकतेच तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, संडे पिक्चर्स. ज्यात ती जमिनीवर बसलेली दिसते आहे. तिने टॉप आणि पॅन्ट परिधान केले आहे. या फोटोशूटवरून आता तिला ट्रोल केले जात आहे. 

एका युजरने लिहिले की, फरशी पुसताना चुकून तोल जातो तेव्हा, तर दुसऱ्याने म्हटले की, लादी पुसतानादेखील ग्लॅमरस दिसते. तर आणखी एका युजरने म्हटले की, मोबाईल उलटा केल्यास पाल छताला चिकटलेली दिसते. मात्र काहींनी तिचे कौतुक केले आहे. छान, सुंदर, नेहमीप्रमाणे जबरदस्त अशा कमेंट्स केल्या आहेत.

सई ताम्हणकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती शेवटची इंडिया लॉकडाऊन चित्रपटात झळकली होती. २ डिसेंबर २०२२ रोजी झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित झाला. सई ताम्हणकर व्यतिरिक्त प्रतीक बब्बर, श्वेता बासु प्रसाद, आहाना कुमरा आणि प्रकाश बेलवाडी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले होते.

टॅग्स :सई ताम्हणकर