Join us

सई ताम्हणकरने शेअर केला डोंबिवली आणि झोंबिवली लूक, अमेय वाघच्या कमेंटनं वेधलं सर्वांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 16:28 IST

काही दिवसांपूर्वी अमेय वाघ आणि वैदेही परशुराम यांचा झोंबिवली(Zombivli) हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

काही दिवसांपूर्वी अमेय वाघ आणि वैदेही परशुराम यांचा  झोंबिवली हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात अमेयने सुधीर जोशी आणि वैदेही त्याची पत्नी सीमाची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदारने केलं आहे. मराठीमधला हा पहिला 'झॉम्बी’पट आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर झॉम्बी फिव्हर चढला आहे. सई सोशल मीडियावर तिचा झोंबिवली लूक शेअर केला आहे. हा लूक शेअर करताना हा आहे माझा झोंबिवली लुक .. आणि तुमचा? असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

1

सईचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सेलिब्रेटींसह चाहते तिच्या या फोटोवर कमेंट करतायते.  झोंबिवलीतील परमसुंदरी! असा सिक्वल करायला हरकत नाही अशी कमेंट अभिनेता अमेय वाघने केली आहे. ललित प्रभाकरने हॉर्न ओके प्लीजअशी कमेंट केलीय. 

सईने आपल्या अभिनयाने मराठी इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण केलं आहे.विशेष म्हजे मराठीच नाहीतर हिंदीतही तिने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. तिने हंटर, लव्ह सोनियो, मिमी या हिंदी चित्रपटात काम केले आहे. तिच्या प्रत्येक भूमिकाही तितक्याच चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरतात. आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. बोल्ड आणि बिनधास्त अशी सईची ओळख आहे.सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रीय असते

टॅग्स :सई ताम्हणकरअमेय वाघ